इंदापूर तालुक्यात विकासकामांच्या निधीवरून सत्ताधारी आणि माजी मंत्री आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 07:58 PM2021-03-15T19:58:42+5:302021-03-15T20:00:01+5:30
अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीमुळे होतीये जनतेची दिशाभूल तालुक्यातील विकासकामे पूर्ण करण्याचे भरणेंचे स्वप्न
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाणीपुरवठा जलसिंचन, रस्तेविकासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधीची भरीव तरतुद केल्याचे नमुद केले आहे. परंतु ही माहिती वस्तुनिष्ठ नसून जनतेची दिशाभूल करणारी आहे. असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांच्यावर केला आहे.
या प्रकरणावरुन इंदापूर तालुक्यात सत्ताधारी आणि माजी मंत्री आमनेसामने आल्याची बाब समोर आली आहे. तसेच मंत्रिपदावरील व्यक्तीने कागदपत्रासह वस्तुनिष्ठ माहिती देणे गरजेचे आहे. गेली दीड वर्षे सत्तेवर असताना पोकळ घोषणा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी वस्तुनिष्ठ माहीती देवुन शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी अशी टीकाही माजी मंत्री पाटील यांनी यावेळी केली आहे.
तालुक्याचे आमदार भरणे यांचा मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणुन समावेश झाल्यानंतर लाँकडाऊनच्या कालावधीत विकासकामे थांबवण्यात आली होती. मात्र यावर्षीच्या अर्थसंकल्पात प्रदीर्घ काळ रखडलेली लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी निधीची तरतूद केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. तसेच रस्ते विकासासाठीही तालुक्यात सुमारे ५०० कोटी रुपयांहुन अधिक निधीची तरतुद झाल्याचे भरणे यांनी रस्ते व गावांच्या नावांसह प्रसिद्द केले. तालुक्यातील गावांना व वाड्यावस्तीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी २५० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी जाहीर केले. हे सर्व नागरिकांची दिशाभूल करणारे ठरत आहे. असे पाटील यांनी सांगितले.
मात्र तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्ममातुन अवर्षणप्रवण लाकडी निंबोडी काझड शिंदेवाडी निरगुडे लामजेवाडी म्हसोबावाडी शेटफळगडे या आठ गावंमधील ४६०० हेक्टर क्षेत्राला दीड हजार मीमी व्यासाची बंद पाईपलाईन मधुन पाणी देण्याची नियोजन आहे. अर्थसंकल्पात निधीची घोषणा झाली आहे. तालुक्यातील ३६ गावांना पाणी देणे, बंधारे बांधणे, धरणातून कालव्यात पाणी सोडणे अशी कामे करण्याचे भरणे यांनी सांगितले आहे. सर्व योजना आगामी काळात मार्गी लावणे भरणे यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. योजना मार्गी लागल्यास विरोधकांना मोठे आव्हान असणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची पकड यामुळे मजबुत होणार आहे.