सरपंच प्रियाताई हाडवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना काळात सामाजिक योगदान देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, स्वयंसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक यांचा कोविड योद्धा म्हणून तसेच माजी सैनिकांचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. कोरोना काळात भरीव योगदान देणारे गावातील विविध संस्था, त्यांचे पदाधिकारी यांचा देखील सन्मान करण्यात आला. सरपंच प्रियाताई हाडवळे, माजी सभापती दिपक औटी यांनी मार्गदर्शनपर भाषणात गावातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आपले व आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करण्याचे आवाहन दीपक औटी यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उपसरपंच माऊली शेळके बाळासाहेब औटी, एम. डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, सतीश पाटील औटी, बाळासाहेब हाडवळे, गोविंद औटी, जी. के. औटी, जयसिंग औटी, निवृत्ती औटी, रवी गाडगे, बंटी हाडवळे, रवींद्र हाडवळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजुरी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:16 AM