लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोकायत संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गोखलेनगर वस्तीत सर्वसामान्यांसाठी प्रश्नमंजूषा व विविध उपक्रम राबवण्यात आले. सर्वांना स्वातंत्र्य चळवळीची माहिती देणारा लघुपट दाखवण्यात आला.
मोठ्यांसाठी मेळावा व छोट्यांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ‘जेंडर स्टॉल’ होता. ज्यात खेळणी वेगळी करणे, मुलांसाठी चपात्या लाटणे व कपड्याला बटण लावणे, मुलींसाठी इलेक्ट्रॉनिक जोडणी असे खेळ खेळण्यात आले. मेळाव्यात स्त्री-पुरुष समानता मूल्यांवर चर्चा झाली. भोंदूबाबा बुवांकडून होणारी फसवणूक आणि अंधश्रद्धा उघड करणारे प्रयोग दाखवण्यात आले. एस. एम. जोशी सभागृहात मिठाचा सत्याग्रह, स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील काही दृष्ये, महिला स्वातंत्र्यवीरांच्या मुलाखती कॅप्टन लक्ष्मी सहगल, हौसाबाई पाटील, भारतीय संविधानाला आकार देणारे गांधी-आंबेडकर आदींच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या.