शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारत सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर होणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 4:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे.

ठळक मुद्देडीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास

पुणे : आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभुषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात व्यक्त केला.

पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलपती डॉ. सी. पी. रामनारायण आदी उपस्थित होते.

राजनाथसिंह म्हणाले, की भारताने तयार केलेल्या लसीचा आज अनेक जगातील अनेक देशांना फायदा होत आहे. देशात शोध आणि संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. संशोधनात भारत पुढे जात आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आपेक्षित आहे. माेठ्या प्रमाणात त्याला चालना मिळून त्यात आणखी गती यायला हवी. भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल पुण्यात दरवर्षी आंतररा‌ष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित व्हायला हव्यात. त्यासाठी डीआयएटी संस्थेने पुढाकार घ्यायला हवा. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी आणि बायो सायन्स या विषयात खूप काही करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. विशेष करून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप संशोधनाची गरज आहे. डीआयएटीतील डॉ. पवनकुमार खन्ना, डॉ. भास्कर मुजुमदार  व आणखी एक अशा तीन शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव  करण्यात आला. २ टक्के ब्रकेटमध्ये त्यांचा समावेश हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार राजनाथसिंह यांनी यावेळी काढले. 

‘आय-डेक्स’फौजीसाठी १ हजार कोटींची तरतुदकेंद्र सरकारने संरक्षणाच्या दृष्टीने इनोव्हेशन व डिफेन्स एक्सलन्ससाठी (आय-डेक्स फॉर फौजी) बाहेरून खरेदीसाठी तब्बल एक हजार कोटी रूपयांची तरतुद केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी तरतुद करण्यात आली. त्याचबरोबर डिफेन्स आणि एअरोपेस क्षेत्रात इनोव्हेशनसाठी ३०० स्टार्टअपला सहाय्य करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. त्यासाठी ५०० कोटी रूपयांचा निधी वेगळा देण्यात आला. ----‘डीआयएटी’ला कोविडचे ९ पेटंटपुण्यातील डीआयएटी संस्थेने कोविड-१९ संदर्भात सखोल संशोधन केले आहे. त्यासाठी  ९ पेटंट मिळाले आहेत. ही गौरवाची बाब असून भारतातील अनेक उद्योग त्याचा वापर करू लागले आहेत, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारत