शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

विज्ञानाच्या क्षितीजावर तळपता भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:15 AM

विज्ञानाप्रमाणेच तंत्रकुशल मनुष्यबळाचीही गरज पंडित नेहरु यांनी जाणली. यातूनच १९६० च्या आरंभी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना झाली. अवकाश ...

विज्ञानाप्रमाणेच तंत्रकुशल मनुष्यबळाचीही गरज पंडित नेहरु यांनी जाणली. यातूनच १९६० च्या आरंभी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना झाली. अवकाश तंत्रज्ञान, अणू विज्ञान या क्षेत्रात भारताने प्रारंभापासूनच जगाला दिपवणारी आघाडी घेतली आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने जागतिक स्तरावर निर्माण केलेला दबदबा आणि मिळवेलली प्रतिष्ठा वाखाणण्याजोगी आहे. ‘शांतीसाठी अणुशक्ती’ हे धोरण घेत भारताने अणुशक्ती संशोधनावर भर दिला. जगाला अजिबात खबर लागू न देता १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे भारतीय शास्त्रज्ञांनी घडवून आणलेल्या अणुस्फोटाने संपूर्ण जग हादरुन गेले होते. त्याचीच पुनरावृत्ती पुढे १९९८ मध्ये झाली. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमधले मैलाचे दगड असे -

१) हरीतक्रांती - स्वतंत्र भारतापुढे दोनवेळच्या पोटभर अन्नाची समस्या होती. त्याला ‘हरितक्रांती’ने उत्तर दिले. आयातीवर अवलंबून असलेला भारत १९७० च्या दशकात अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. रासायनिक खतांचा वापर, सिंचन सुविधा यातून हरीतक्रांती घडली. यात सिंहाचा वाटा उचलला तो इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (आयसीएआर)ने संशोधित केलेल्या प्रामुख्याने तांदूळ, गहू, ज्वारी या पिकांच्या सुधारीत वाणांचा. यामुळे कधीकाळचा आयातदार भारत आता तांदूळ, गहू, साखर यासह अनेक फळे निर्यात करणारा देश बनला आहे.

२) श्वेतक्रांती -शेतीपूरक उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्धोत्पादनात साठच्या दशकापासून भारताने कमालीची प्रगती केली. तत्पुर्वी लोणी, चीज, दुध पावडर या दुग्धजन्य पदार्थांची आयात भारताला करावी लागत होती. मात्र देशात पन्नासच्या दशकात सुुरु झालेल्या अत्याधुनिक डेअरी चळवळीने देशात दुधगंगा वाहू लागली.

३) उपग्रह आणि दूरसंचार क्रांती - १९६० च्या दशकात विक्रम साराभाई इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्त्वात अवकाश संशोधनात भारताने आघाडी मिळवली. उपग्रह आकाशात सोडण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी प्राविण्य मिळवले आहे. जगातील अनेक देश आता भारतातून त्यांचे उपग्रह सोडतात. देशी बनावटीच्या उपग्रहांचा उपयोग दूरसंचार, हवामान, संरक्षण, शिक्षण, कृषी, आरोग्य, बँकिंग अशा विविध कारणांसाठी यशस्वीरित्या केला जात आहे.

ठळक नोंदी

१९ एप्रिल, १९७५ - इस्त्रोने तयार केलेला पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडण्यात आला.

३ ऑक्टोबर, १९७८ - भारतातील पहिल्या आणि जगातल्या दुसऱ्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा जन्म. बेला अग्रवाल यांनी कोलकात्ता येथे दुर्गा या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म दिला.

१९८३ - अंटार्टिक संशोधन मोहिमेअंतर्गत दक्षिण ध्रुवावर गंगोत्री या पहिल्या भारतीय संशोधन स्थळाची स्थापना.

२ एप्रिल, १९८४ - भारतीय वायुसेनेतील वैमानिक राकेश शर्मा हे भारताचे पहिले अवकाशवीर ठरले. इस्रो आणि रशिया यांच्या संयुक्त मोहिमेत ‘सोयुझ’ अवकाश यानातून शर्मा यांनी अवकाशात भरारी घेतली.

२२ मे १९८९ - सन १९८८ मध्ये पृथ्वी या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर वर्षभरातच तब्बल पाच हजार किलोमीटर दूरवर शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने घेतली.

१३ मे, १९९८ - जगातली सहावी आण्विक शक्ती म्हणून भारत उदयाला आल्याची घोषणा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या दिवशी केली. तत्पुर्वी दोन दिवस ‘ऑपरेशन शक्ती’ या मोहिमेअंतर्गत भारताने एका आण्विक शस्त्रांच्या एका पाठोपाठ पाच चाचण्या घेऊन जगाला कानठळ्या बसवल्या. ‘पोखरण - २’ नावाने या चाचण्या ओळखल्या जातात.

२२ ऑक्टोबर २००८ - ‘चांद्रयान-१’ या भारताच्या पहिल्या महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिमेची सुरुवात झाली. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘पीएसएलव्ही’चे लॉंचिंग झाले. चंद्राची निरिक्षणे टिपण्याचा तसेच भविष्यातील अवकाश मोहिमेची पूर्वतयारी हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

२६ जुलै, २००९ - संपूर्णत: देशी बनावटीची, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारी पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ कार्यान्वित झाली.

२७ मार्च २०१४ - जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमूक्त देश म्हणून जाहीर केले. “जागतिक आरोग्याच्या बाबतीत मी पाहिलेली सर्वोच्च कामगिरी,” या शब्दात बिल गेट्स यांनी या यशाचे कौतुक केले.

२४ सप्टेंबर २०१४ - मंगलयान या भारताच्या पहिल्या आंतरग्रह मोहिमेचा प्रारंभ. भारतीय बनावटीच्या उपग्रहाने मंगळाच्या दिशेने उड्डाण करुन मंगळाचा वेध घेणारा भारत हा पहिला आशियाई आणि जगातला चौथा देश ठरला. शेजारी चीननेही ‘प्राईड ऑफ एशिया’ या शब्दात भारताच्या यशाची प्रशंसा केली. विशेष म्हणजे अमोरिका, युरोपच्या तुलनेत अत्यल्प खर्चात भारताने मंगलयान मोहिम यशस्वी केली. २८ सप्टेंबरला मंगळाची छायाचित्रे जगापुढे सादर केली.

२०१६ - लेजर इंटरफेरोमिटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (लिगो) या प्रकल्पाची अमेरिकेच्या सहाय्याने उभारणी सुरु झाली. राष्ट्रीय अणू उर्जा विभागाने या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातल्या औंढा (जि. हिंगोली) या स्थळाची निवड केली. या प्रकल्पात कृष्ण विवरांचे संशोधन कार्य २०२४ मध्ये सुरु होणार आहे. यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठानशी करार झालेला आहे.