मार्गासनी : सामाजिक परिवर्तनासाठी भारतीय राज्यघटना एक आदर्श स्वरूपाची आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक गंगाधर बनसोडे यांनी केले.
समाज शिक्षण मंडळ विंझर संचालित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक बनसोडे बोलत होते. यावेळी बनसोडे पुढे म्हणाले की, राज्यघटना तयार करत असताना सामाजिक परिवर्तन, राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता आणि लोकशाही मुल्ये ही तीन ध्येय भारतीय घटनाकारांच्या पुढे होती. त्यानुसार राज्यघटना तयार झाली. पण सध्याच्या राजकारणात ठराविक लोकांच्याच हातात सत्ता आहे. राज्यघटनेतील तत्वानुसार राज्यघटनेचा वापर झाला पाहीजे.
भारतीय राज्यघटना जगातील सर्वात उत्कृष्ठ असून भारतातील लोकांनी त्या घटनेनुसार काम केले पाहीजे, असे मत मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुभैय्या परदेशी यांनी व्यक्त केले. भारतीय राज्यघटना ही एक आदर्श स्वरुपाची राज्यघटना असून लोकांनी घटनेतील तरतुदीचे काटेखोरपणो पालन केले पाहीजे भारताला महासत्ता बनविण्यासाठी राज्यघटनेचा आधार घेतला पाहीजे असे प्राचार्य डॅा.संजीव लाटे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्राध्यापक योगेश श्रीखंडे यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन सामुदायिक रित्या केले.
विशाल दिघे याने प्रास्ताविक केले तर समीर राऊत यांनी सूत्रसंचालन व आभार विद्यापीठ प्रतिनिधी प्रियंका मळेकर हिने मानले. यावेळी जेष्ठ प्राध्यापक बाळासाहेब केंदळे, डॉ.महादेव डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापिक सीमा बागुल, प्राध्यापक रितेश वांगवाड, प्राध्यापक दत्तात्रय घोडके, प्राध्यापक देविदास लांडगे, प्राध्यापक किरण जाधव, प्राध्यापक अंकुश नामदास, प्राध्यापक रामचंद्र मोकाशी आदीसह विद्यीर्थी उपस्थित होते. (वार्ताहर)