पुणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवारी दुपारी दोन तास सत्याग्रह आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी साठी केंद्राने समितीची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या विरोधशत आयएमए च्या राष्ट्रीय शाखेने बुधवारी सकाळी ११ ते १ या वेळेत देशभर आंदोलन पुकारले होते. पुण्यात रुग्णाची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी आंदोलन करण्यात आले, अशी माहिती आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यानी दिली. यावेळी राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा, पुणे शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, डॉ. आरती निमकर, माजी अध्यक्ष डॉ. अरुण हळबे, डॉ. अंबरीश शहाडे आदी यावेळी उपस्थित होते. क्लिनिकल एस्टॅबलिशमेंट अॅक्टमध्ये अपेक्षित बदल, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला विरोध, पीसीपीएनडीटी कायद्यातील त्रुटी सुधाराव्यात अशा आयएमएच्या विविध मागण्या आहेत. (प्रतिनिधी)
इंडीयन मेडीकल असोसिएशनचा सत्याग्रह
By admin | Published: November 17, 2016 3:49 AM