कामशेत (पुणे) : मुंबई-पुणे लोहमार्गावर अज्ञात रेल्वेची धडक बसून एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.११) रोजी घडली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्हे गावच्या दरम्यान किलोमीटर क्रमांक १५२/३७ जवळ अज्ञात रेल्वेच्या खाली सापडून एका अनोळखी महिलेचा (अंदाजे वय ६०) मृत्यू झाला.
मयत अंगाने मजबूत, उंची सुमारे पाच फूट, रंगाने गोरी, गोल चेहरा व काळे पांढरे केस होते. मयत महिलेच्या अंगावर लाल रंगाचा ब्लाऊज व भगव्या रंगाची साडी नेसलेली आहे. तरी या संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.