पुणे : मध्य रेल्वे विभागकडून नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या आठवड्यातून दोन दिवसांवरून तीन दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
नागपूर ते पुणे सुपरफास्ट उन्हाळी ९ फेऱ्या विशेष गाडी क्र.०११६५ (दि. १८ एप्रिल ते १३ जून) पर्यंत दर गुरुवारी आठवड्यातून तीन दिवस धावेल. पुणे ते नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष ९ फेऱ्या गाडी क्र.०११६६ (दि.१९ एप्रिल ते १४ जून) पर्यत दर शुक्रवारी धावेल. या उन्हाळी विशेष गाडी १३ एप्रिलपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस या ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.