पुणे : दक्षिण विभागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी अति महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरून जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यात दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बंगळुरू विभागातील साई पी निलयम- बसमपल्ले स्टेशनदरम्यान असलेल्या रेल्वे बोगदा ब्रिज क्र. ६५ ए जवळ ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक घेऊन रॉक बोल्टिंग, ड्रेनेज जाळी, ग्राउटिंग इत्यादी विविध कामे सुरू आहेत. हे काम दोन महिने चालणार आहे. त्यामुळे काही गाड्या प्रभावित केल्याने इतर मार्गावरून धावणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे प्रवाशांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.
या मार्गावर धावणार रेल्वे :
- बंगळुरूहून सुटणारी गाडी क्रमांक ११३०२ बंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई उद्यान एक्स्प्रेस पेनुकोंडा- नागसमुद्रम - धर्मावरम या बदललेल्या मार्गाने धावेल. मात्र साई पी निलयम स्टेशनवर जाणार नाही.
- दि. २३, ३० डिसेंबर २०२३ आणि ०६, १३, २०, २७ जानेवारी आणि ०३ फेब्रुवारीची तिरुअनंतपुरम येथून दर शनिवारी सुटणारी गाडी क्रमांक १६३३२ तिरुअनंतपुरम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस तिरुपती - जोलारपेट्टे - रेनिगुंठा - गुंतकल या बदललेल्या मार्गाने धावेल. मात्र बंगारपेट, कृष्णराजपुरम, हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर स्टेशनवर जाणार नाही.
- दि. १८, २५ डिसेंबर व ०१, ०८, १५, २२ व २९ जानेवारीला अजमेरहून दर सोमवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक १६५३१ अजमेर - बंगळुरू एक्स्प्रेस हुबळी - अर्सिकेरे - यशवंतपूर या बदललेल्या मार्गाने धावेल. मात्र गदग, कोप्पल, होस्पेट, बेल्लारी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम आणि हिंदूपूर स्टेशनवर जाणार नाही.
- दि. २०, २७ डिसेंबर व ०३, १०, १७, २४ व ३१ जानेवारीला जोधपूरहून दर बुधवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक १६५३३ जोधपूर-बेंगळुरू एक्स्प्रेस हुबळी-अर्सिकेरे- यशवांपूर या वळवलेल्या मार्गाने धावेल. मात्र गदग, कोप्पल, होस्पेट, बेल्लारी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम आणि हिंदूपूर स्टेशनवर जाणार नाही.
- दि. २२, २९ डिसेंबर २०२३ व ०५, १२, १९, २६ जानेवारीच्या ओखा येथून दर शुक्रवारी सुटणारी साप्ताहिक गाडी क्रमांक १९५६८ ओखा- तिरुनेलवेली एक्स्प्रेस ही गुंतकल- रेनिगुंठा- जोलारपेट- सालेम या बदललेल्या मार्गाने जाईल. मात्र, अनंतपूर, धर्मावरम, हिंदूपूर, येलहांका, कृष्णराजपुरम, बंगारपेट स्थानकांवर जाणार नाही, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.