स्वामीनाथन यांनी केलेल्या कामगिरीमुळे हरितक्रांती व धवलक्रांतीने भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. तसेच कोळशापासून ऊर्जा निर्मिती, अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि हायड्रो इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेशनसाठी अनेक शास्त्रज्ञ मोलाचे दिले तसेच प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी दिलेले ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातील योगदान विसरता येत नाही. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर व पुढे इतर शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीमुळे देशात संगणक क्रांती घडू शकली. त्यातून देशाचा चेहरामोहरा बदलून गेला.
एस. के. मित्रा, शांतीस्वरूप भटनागर, हरिश चंद्रा, कमला सोहोनी, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनीसुद्धा देशाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविण्यात मोलाचे योगदान दिले.