सोलापूर : स्वातंत्र्याच्या शतकीय वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत देश चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. एकविसावे शतक हे भारताचे असून, सध्या सुरू असलेला महत्त्वाचा काळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे युवकांनी खूप कष्ट घ्यावे, सुंस्कारित राहून उद्याचा भारत घडवावा, असे आवाहन महासंगणकाचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी येथे केले.सोलापूर ह्यलोकमतह्णच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ह्यस्टार २५ह्ण या मालिकेतील ह्यजनरेशन नेक्स्टह्ण ही पहिली विशेष पुरवणी शुक्रवारी प्रकाशित झाली. ह्यजनरेशन नेक्स्टह्णमधील शिलेदारांचा डॉ. भटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी मंत्री आमदार दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, ह्यलोकमतह्णचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे मंचावर होते.डॉ. भटकर म्हणाले, भारताचा इतिहास प्राचीन आहे. आज हा देश युवकांचा असल्याचे मानले जाते. एकविसावे शतक सुरू होताना या शतकाचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा कोणत्या देशाचे शतक आहे, याची चर्चा झाली.या अभ्यासाच्या निष्कर्षातून२१ वे शतक हे भारताचेच असल्याचे स्पष्ट झाले. आज भारत चीन, अमेरिकेनंतर तिसºया क्रमांकाचा देश आहे. २०४७ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याचे शतक साजरे होईल तेव्हा भारत चीनला मागे टाकून जगात प्रथम क्रमांकाचा देश असेल.पालकमंत्री देशमुख, आमदार सोपल यांनी ह्यलोकमतह्णच्या उपक्रमाची प्रशंसा केली. प्रारंभी संपादक राजा माने यांनी प्रास्ताविकात ह्यलोकमतह्णने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन या उपक्रमामागील उद्देश विषद केला.सोलापूर ह्यलोकमतह्णच्या फेसबुक पेजचे अनावरणजनरेशन नेक्स्ट सन्मान सोहळ्यात डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सोलापूर ‘लोकमत’च्या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. डॉ. भटकर यांनी फेसबुकच्या साईटवर जाऊन ‘लोकमत’च्या पेजला क्लिक केले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे स्वागत केले.