शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तुर्कस्थानविरूद्ध भारताचे ४ मल्ल विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 11:08 PM

महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तुर्कस्थानच्या मल्लांविरुद्ध भारताच्या विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके या ४ मल्लांनी जबरदस्त कामगिरी करीत विजय नोंदविले.

पुणे : महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तुर्कस्थानच्या मल्लांविरुद्ध भारताच्या विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके या ४ मल्लांनी जबरदस्त कामगिरी करीत विजय नोंदविले. हिंदकेसरी साबा कोहालीला मात्र यावेळी पराभवाचा सामना करावा लागला.कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. पहिल्या लढतीत मुन्ना झुंझुरकेने ईयुप ओरमानला पराभूत केले. तिसऱ्याच मिनिटाला मुन्नाने ‘लाटणे’ डाव टाकून ओरमान याला बेमालूमपणे चितपट केले. अटीतटीच्या माऊली जमदाडेने गु-हकन बल्की याच्यावर सरशी साधली. माऊलीने आक्रमक चढाया करीत बल्कीला मैदानाबाहेर ढकलले. ‘घिसा’ या डावावर बल्कीला चीतपट करून माऊलीने विजय साकारला.६ मिनिटे रंगलेल्या अतिशय चुरशीच्या लढतीत ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरीने अहमत सिलबिस्टला पराभूत केले. विजयने ‘घुटना’ डाव टाकून सिलबिस्टला चीतपट करून कुस्ती मारली. मेटीन टेमिझी याच्याविरुद्ध झालेल्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने ’एकचाक’ डावाद्वारे मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवले. हिंदकेसरी साबा कोहलीला मात्र इस्माईल इरकल याच्याकडून पराभूत व्हावे लागले. दोन्ही मल्लांनी तोडीस तोड खेळ केला.मात्र, निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडूंना गुण मिळविण्यात अपयश आले. आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रथम गुण मिळविणा-या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. इरकलने निर्णायक गुण मिळवत ही लढत जिंकली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, महापौर मुक्ता टिळक, स्पर्धा आयोजक नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त कुणालकुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, मनपाचे क्रीडा उपायुक्त तुषार दौंडकर यांच्या हस्ते झाले.