लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आशियाई सर्किटमधील १८ वर्षांखालील गटांतील आशियाई कुमार टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात मेघ भार्गव पटेल याने, तर मुलींच्या गटात आकांक्षा भान, रिया वर्मा, वैदेही चौधरी, तनिशा कश्यप या ५ भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुस?्या फेरीत प्रवेश केला. एमएसएलटीए स्कुल आॅफ टेनिस, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत भारताच्या मेघ भार्गव पटेल याने चीनच्या ताओ मु याचा २-६, ६-४, ६-४ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या अकणीत पमजित याने भारताच्या रित्वीक बोलीपल्लीला ६-४, ६-२ असे नमविले. क्वालिफायर हाँग काँगच्या डेंटन हो याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या प्रसन्ना बागडेचा ६-०, ६-३ असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. थायलंडच्या कशिदीत समरेज याने भारताच्या रिषभ शारदाचा ६-२, २-६, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून दुस?्या फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात पहिल्या फेरीत भारताच्या व तिस?्या मानांकित आकांक्षा भान हिने चीनच्या जिओक्सी झाओचा टायब्रेकमध्ये ७-६(४), ६-४ असा पराभव करून आगेकूच केली. आठव्या मानांकित रिया वमार्ने कोरियाच्या जिहो शीणचा ६-३, ७-६(५) असा पराभव केला. जपानच्या सकुरा होसोगी हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या युब्रानी बॅनजीर्चा ६-१, ६-१ असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. भारताच्या व सातव्या मानांकित वैदेही चौधरीने जपानच्या आयु सुगीयामाचे आव्हान ६-०, ६-०असे मोडीत काढले. जपानच्या मना कवामुराने भारताच्या शिवानी मंजनाला ६-३, ६-१ असे पराभूत केले. निकाल : एकेरी गट : पहिली फेरी : मुले : अकणीत पमजित (थायलंड) वि. वि. रित्वीक बोलीपल्ली (भारत)६-४, ६-२; डेंटन हो (हाँग काँग) वि.वि.प्रसन्ना बागडे (भारत) ६-०, ६-३; कशिदीत समरेज (थायलंड) वि.वि.रिषभ शारदा (भारत) ६-२, २-६, ६-३; मेघ भार्गव पटेल (भारत) वि.वि.ताओ मु (चीन) २-६, ६-४, ६-४. मुली : सकुरा होसोगी (जपान) वि.वि. युब्रानी बॅनर्जी (भारत) ६-१, ६-१; ली कुआन यी (तैपेई) वि.वि.मुस्कान गुप्ता (भारत) ६-३, ६-३; तनिशा कश्यप (भारत) वि.वि. श्रीवल्ली भामिदिप्ती (भारत) ७-५, ६-२; आदित्या करुणरत्ने(श्रीलंका) वि.वि. तेजस्वी काटे (भारत) ६-१, ६-२; वैदेही चौधरी(भारत)वि.वि.आयु सुगीयामा(जपान)६-०, ६-०; माई नपात निरुद्रोण(थायलंड) वि.वि.शिवानी अमिनेनी(भारत)६-३, २-६, ७-६(२); मना कवामुरा(जपान) वि.वि.शिवानी मंजना(भारत)६-३, ६-१; आकांक्षा भान(भारत) वि.वि.जिओक्सी झाओ(चीन)७-६(४), ६-४; रिया वर्मा(भारत) वि.वि.जिहो शीण (कोरिया) ६-३, ७-६ (५).
भारताचे ५ खेळाडू दुसऱ्या फेरीत
By admin | Published: May 31, 2017 2:52 AM