एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाद्वारे आयोजित परिसंवादामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे, एमआयटी रिसर्च अँड इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. वीरेंद्र भोजवानी आदी उपस्थित होते. डॉ. थोरात यांनी कॅन्सर प्रकल्प आणि संशोधन, आरोग्याला मिळत असलेले दुय्यम महत्व, कोरोनामुळे झालेले सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक नुकसान आणि भारतात संशोधनाबाबत असलेली उदासीनता अशा विविध विषयावर संवाद साधला.
थोरात म्हणाले, विद्यापीठ हे संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असतात. कोरोनासंदर्भात लस शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची होती. संशोधनासाठी पुढील २० वर्षांचा विचार करून गुंतवणूक करावी लागेल. शिक्षण संस्थांनी केवळ नफा न बघता मानवी कल्याणासाठी संशोधन करावे तसेच संशोधनात्मक वातावरण तयार करावे. शिक्षण पद्धतीमध्ये टीकात्मक शिक्षण पद्धतीचा अंतर्भाव असवा. पाश्चात्य विद्यापीठांमध्ये आणि येथे होणाऱ्या संशोधनानंतर संपूर्ण बाबींचा अभ्यास आणि त्याचे आलोचनात्मक अध्ययन करावे लागेल. याच कारणामुळे पाश्चात्य विद्यापीठ कितीतरी आपल्या पुढे आहेत.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, की संशोधनासाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठ संशोधनाला विशेष महत्व देत आहे. पाश्चात्य देशातील विद्यापीठांमध्य़े शैक्षणिक संस्कृती भारतातील विद्यापीठांमध्ये निर्माण व्हावे. भविष्यात एमआयटी एडीटी विद्यापीठ शिक्षणाच्या नवीन मॉडेलद्वारे एक उदाहरण जगासमोर ठेवेल. सर्वच शिक्षण संस्थांनी संशोधनाच्या कामात अग्रेसर असणे गरजेचे आहे.