शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

इंदापूरला २६९ कोटींचा निधी मंजूर

By admin | Published: March 01, 2016 1:17 AM

महाराष्ट्र राज्य महापारेषण व वीज वितरण कंपनीच्या कामासाठी इंदापूर तालुक्याकरिता २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर : महाराष्ट्र राज्य महापारेषण व वीज वितरण कंपनीच्या कामासाठी इंदापूर तालुक्याकरिता २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.राज्य वीज मंडळाचे सदस्य प्रवीण शिंदे, बारामती विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल घोलप यांच्यासमवेत झालेल्या महापारेषण व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, की दीनदयाळ उपाध्याय योजना डीपीसीआयपीएल योजनांतर्गत, शेळगाव, लासुर्णे, लोणी देवकर, बाभूळगाव, पिंपरी, टण्णू याठिकाणी ३३ के. व्ही क्षमतेच्या सबस्टेशनसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत, लवकरच सबस्टेशनचे उद्घाटन होणार आहे. या कामासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही कामे त्वरित पूर्ण झाली आहेत. तसेच, बिजवडी, रेडणी, अगोती नं. १, इंदापूर, काळेवाडी, भाटनिमगाव येथील सबस्टेशनमध्ये अतिरिक्त रोहित्र बसविण्यात येणार आहे. यामुळे या भागातील शेतपंपाना व कारखान्याना पुरेसा वीजपुरवठा होणार आहे. वीज खंडित होणार नाही, असे सांगून भरणे पुढे म्हणाले, की इंदापूर शहरात भूमिगत वीजलाईन टाकण्यासाठी ८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम एक वर्षात पूर्ण करण्याचा महामंडळाचा संकल्प आहे. त्यामुळे इंदापूर शहरात सुटसुटीतपणा येणार आहे. ज्या ठिकाणी उंच इमारती उभ्या आहेत. त्याठिकाणी वीज प्रवाहक तारांचा होणारा त्रास बंद होणार आहे. वीजप्रवाह तारांना चिटकून होणारे अपघात यापुढे बंद होतील, असे भरणे यांनी स्पष्ट केले. वालचंदनगर येथे नवीन २२० के. व्ही क्षमतेच्या सबस्टेशनसाठी ११९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.