शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

प्रदूषणामुळे इंद्रायणीचे पावित्र्य हरपले

By admin | Published: April 28, 2017 5:41 AM

भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने

शेलपिंपळगाव : भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात येऊ लागले आहे. मागील काही महिन्यांपासून नदीच्या प्रदूषणात कमालीची वाढ होत आहे. आळंदीतील स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महिन्यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच नदी स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत. इंद्रायणीला पूर्वीचे निर्मळ वैभव कधी प्राप्त होणार? असा सवाल भाविकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.सध्या आळंदीतील पवित्र इंद्रायणी पात्रात पाण्याचा अतिशय अल्प साठा आहे. त्यामुळे नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे ठणठणीत पडले आहे. परंतु पात्रात शिल्लक असलेल्या पाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पश्चिमेकडील औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित घाण पाणी इंद्रायणीच्या प्रवाह पात्रात सोडले जात असल्याने पाण्याचा निळा रंग बदलून पाण्याला काळा कुळकुळीत रंग आलेला आहे. त्यातच इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जात असून, बिनधास्तपणे सांडपाणी सोडले जात असल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. परिणामी पाण्याचा दुर्गंधीयुक्त घाण वास येऊ लागला आहे. आळंदी हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे समाधिस्थळ असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत माउलींच्या दर्शनासाठी येत असते. परंतु वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते, घनकचरा, दुर्गंधी अतिक्रमण आदी विविध समस्यांमुळे ‘देवाच्या दारी समस्या भारी’ असाच प्रत्यय सध्या भाविकांना अनुभवयास मिळत आहे. अस्ताव्यस्त पडलेला केरकचरा, काचा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खरकटे अन्न आदी गोष्टींमुळे नदी प्रदूषित झाली आहे.