शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

आषाढीवारी सोहळ्याच्या तोंडावर इंद्रायणीची 'हिमनदी'! रसायनयुक्त फेसाने भाविकांची होणार गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 1:18 PM

पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे....

आळंदी (पुणे) : यंदाचा आषाढी पायीवारी सोहळा अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशातच जलप्रदूषणामुळे आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी रसायनयुक्त फेसाने फेसाळलेली आहे. आळंदीत वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी व पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्यातरी गटारीचे नसून पवित्र इंद्रायणी नदीचे आहे. पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायनमिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शींना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे.

इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दूरगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोअर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालणार का? असा सवाल स्थानिक जनतेकडून उपस्थित होत आहे.

उदासीनता दूर होणार का?

आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येत्या २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत दाखल होऊन सोहळ्यानिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करणार आहेत. विशेषतः अनेक भाविक नदीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र सद्यस्थितीतील इंद्रायणीची अवस्था पाहता भाविकांनी स्नान किंवा पाणी प्राशन करावे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. तर दुसरीकडे राज्यसरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा, एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

उपाययोजना न केल्याने नाराजी

आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा केला आहे. विशेषतः पावसाळी अधिवेशनात तारांकित व नागपुरातील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून स्थानिकांची व वारकऱ्यांची भूमिका खंबीरपणे मांडली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही संबंधित मंत्रिमहोदयांनी दिली होती. मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून कोणतेही उपाययोजना आखलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड