भोर तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतसाठी ८५.५३ % मतदान
भोर :
भोर तालुक्यात ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.
संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८५.५३ % मतदान झाले आहे. 69345 मतदानापैकी ५६६२१ मतदारानी मतदान केले यात महिला २७२८० आणि पुरुष २९३४१ मतदारांनी मतदान केले.
अनेक गावांत अटीतटीच्या लढती असून निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. भोर तालुक्यातील ७३ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ६५७ जागांसाठी ७७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सदर उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी सुमारे १ हजार मतदान कर्मचारी ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आले होते.
भोर तालुक्यात सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली ९.३० वाजेपर्यंत १७.३०%, ११.३० वाजेपर्यंत ३९.२३%
१.३० वाजेपर्यंत ६०.४०%,३.३० वाजेपर्यंत ७५.९७% तर ५.३० वाजेपर्यंत ८५.५३ % मतदान झाले वीसगाव खो-यातील आंबाडे, खानापूर, बालवडी, खानापूर, बाजारवाडी, धावडी गोकवडी या मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
महामार्गावरील शिंदेवाडी, वेळू, कामथडी, नसरापूर, सारोळे तर पूर्व भागातील न्हावी३२२, न्हावी १५, टापरेवाडी, भोंगवली या गावातही अटीतटीची लढत होत असल्यामुळे मतदारानी केंद्रावर रांगा लावल्या होत्या खानापूर मतदान केंद्रावर लक्ष्मीबाई नांगारे या ८५ वर्षांच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला. सकाळी १२ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ नंतर मतदानाला वेग आला होता. कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत मतदान झाले. मात्र अनेक गावात अतितटीची लढत असल्याने मतदारांना आणण्यासाठी चुरस निर्माण झाली होती.
भोर तालुक्यातील ७३ ग्रामपंचायची पैकी १० ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे ६३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काल २४ एसटी बसमधून १ हजार कर्मचारी व १६७ मतदान यंत्रे भोर शहरामधून मतदान केंद्रावर पाठवण्यात आले होते. आज मतदान होत असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. अनेकांनी विजयाचे दावे केले असले तरी मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
खानापूर मतदान केंद्रावर मतदानाला जाताना वयोवृध्द
लक्ष्मीबाई नांगरे फोटो