भोर :
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा व डोंगरी आणि दुर्गम असणाऱ्या भोर विधानसभा मतदार संघासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे १२ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या टंचाई आराखड्यास निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
यामध्ये नळपाणी पुरवठा विशेष दुरुस्ती योजनेसाठी ९११.४५ लक्ष तात्पुरत्या पूरक योजनेसाठी २९४.००लक्ष, गाळ काढणे/ विहीर खोलीकरण करणे योजनेसाठी ४.५० लक्ष व विधन विहीर दुरुस्तीठी ४३.१५ लक्ष आणि नवीन विंधन विहिरीसाठी ३३.७५ लक्ष याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आलेला आहे. भोर, वेल्हा व मुळशी तालुका टंचाई आराखडा समिती अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी मतदार संघातील तालुक्यांची टंचाई आराखड्यास मान्यता देऊन मंजुरीसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचे आदेश दिले होते.
आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नांतून व जिल्हा परिषद सदस्य, तथा काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे व वेल्हा तालुका जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर टंचाई आराखड्यातील कामांना मंजुरी मिळाली आहे.त्याचप्रमाणे सदर मंजूर कामांच्या निविधा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. सदर कामांमुळे भोर,वेल्हा व मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.तसेच सदर मंजूर कामांमुळे तीनही तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मंजूर निधीचा योजनानिहाय खालील प्रमाणे
नळपाणी पुरवठा विशेष दुरुस्ती -भोर तालुका २५१.९५ लक्ष,वेल्हे तालुका ३५१.५० लक्ष, मुळशी तालुका ३०८.०० लक्ष एकूण रक्कम रू.९११.४५ लक्ष,तातपुरती पुरक योजना-भोर तालुका १५७.०० लक्ष,वेल्हे तालुका १३७.०० लक्ष,एकूण रक्कम रू.२९४.०० लक्ष.गाळ काढणे / विहीर खोलीकरण-भोर तालुका ४.५० लक्ष, विंधन विहीर दुरूस्ती -भोर तालुका ०.८०लक्ष, मुळशी तालुका ४२.३५ लक्ष एकूण रक्कम रू.४३.१५ लक्ष,नवीन विंधन विहीर -भोर १८.०० लक्ष,वेल्हे तालुका ११.०० लक्ष, मुळशी तालुका ४.७५ लक्ष.