मंगळवार ( दि. ९ ) रोजी इंदापूर नगरीच्या ग्रामदैवत श्री इन्द्रेश्वर महादेव यात्रेला प्रारंभ नंदीध्वज पुजन आणि चौथरा पुजन इंदापूर नगरीच्या प्रथम नागरीक, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा या उभयंताच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक ब इजगुडे, नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अनिकेत वाघ, उदयशेठ शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री इंद्रेश्वर महादेवाची यात्रेला नंदीध्वज पूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावर्षी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून श्री इंद्रेश्वर महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मात्र सध्या वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासनाने दिलेले नियम पाळून, भाविकांनी गर्दी न करता नियमांचे कड़क पालन करावे अशी विनंती देवस्थानचे ट्रस्टी यांनी केली आहे.
महाशिवरात्रीच्या अगोदर तीन दिवस सलग यात्रा दरवर्षी चालू असते, पहिल्या दिवशी नंदीध्वज पूजन, दुसऱ्या दिवशी रथ यात्रा व महाप्रसाद असतो तर महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द झाली आहे. केवळ धार्मिक विधी होणार आहे. अशी माहिती ट्रस्टच्या सदस्यांनी दिली. फोटो ओळ : ग्रामदैवत श्री इन्द्रेश्वर महादेवच्या नंदीध्वज पूजन करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा