पुणो : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईमध्ये कुख्यात गुन्हेगार बंटी पवारसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून दोन गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिली.
बंटी ऊर्फ महेश प्रकाश पवार (वय 24, रा. सिंहगड रस्ता, वडगाव बुद्रुक) व अविनाश मधुकर कदम (वय 4क्, रा. गणोश पेठ, अल्पना टॉकीजशेजारी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. बंटी पवार हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर दोन खून, बलात्कार, व्यावसायिकांना धमकावणो, खंडणी मागणो, प्राणघातक हल्ला करणो, बेकायदा हत्यारे बाळगणो आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सिंहगड रस्ता परिसरात त्याची दहशत आहे.
बंटी व कदम गणोश पेठेतील दूध भट्टीजवळ पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एटीएसच्या कर्मचा:यांना खब:यामार्फत मिळाली होती. बंटी पवारने यापूर्वी पोलिसांवर गोळीबार केलेला असल्यामुळे अधिक सतर्कता बाळगून सापळा लावण्याच्या सूचना वरिष्ठ निरीक्षक बर्गे यांनी दिल्या होत्या.
सहायक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर, सुनील पवार, सचिन जाधव, आप्पा गायकवाड, संदीप टेमगुडे, कौस्तुभ जाधव, सुधीर लोखंडे, शंकर संपते यांनी सापळा लावून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता 5क् हजार 6क्क् रुपयांची दोन गावठी पिस्तुले आणि सहा काडतुसे मिळून आली. या दोघांविरुद्ध एटीएसच्या मुंबई येथील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)