चाकण : खेड येथील पोलीस कोठडीत असताना जेल तोडून फरार झालेला; तसेच तीस जबरी चोºया, घरफोड्या व वाहनचोरी करणाºया विशाल तांदळेसह त्याच्या तीन जणांच्या टोळीस चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून एक दरोडा, चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी चाकण पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. बैलबाजार रोड, मंचर, ता. आंबेगाव, जि.पुणे ), गणेश भास्कर वाबळे (वय १८, रा. भेंडेमळा, मंचर, ता. आंबेगाव) व आरिफ अस्लम नाईकवाडे (वय २१, रा. संभाजीनगर, मंचर, ता. आंबेगाव) या तिघांना रविवारी दि. १३ रोजी रात्री २ च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी विशाल तांदळे हा २० आॅक्टोबर २०१८ रोजी खेड पोलीस ठाण्याचे जेल तोडून फरार झाला होता. त्याच्या सोबत जेलमधून फरार झालेला आरोपी राहुल गोयेकर याचा नगर जिल्ह्यात खून झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी : दि. १२ जानेवारी २०१९ रोजी वाघजाईनगर येथील चाकण-तळेगाव रोड वरील पाण्याच्या टाकीजवळ फिर्यादी राजकुमार प्रजापती यांच्या बोलेरो गाडीला (एमएच १४ एसी ६९२३) स्विफ्ट डिझायर कार (एमएच १४ डीएक्स ८७८५) ही गाडी आडवी मारून त्यामधील अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे रोख रक्कम सहा हजार रुपये, दोन मोबाईल, बोलेरो गाडी असा ऐवज, लोखंडी कोयता व चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकून चोरून नेले होते.त्या अनुषंगाने एचपी पेट्रोलपंप सावरदरी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.सदरची कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्तस्मार्तना पाटील, पोलीस आयुक्त चंद्रकांत आलसटवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, विजय जगदाळे, पोलीस हवालदार पप्पू हिंगे, स्वामी, पोलीस नाईक सोनवणे, जरे, गोरड, राळे, भाम्बुरे, गायकवाड यांच्या पथकाने केली.पोलिसांनी केली नाकाबंदीसावरदरी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस नाईक कांबळे, सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल वरपे यांच्या पथकाने नाकाबंदी केली होती. यावेळी नाकाबंदी चालू असताना एका स्विफ्ट गाडीचा संशय आल्याने थांबवण्याचा इशारा केला असता गाडीतील इसम गाडी जागेवर सोडून पळण्याच्या प्रयत्न करत होते.४यावेळी पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घालून तिन्ही आरोपीस ताब्यात घेतले. त्यातील आणखी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन दरोडा, चार जबरी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्यावर नाशिक, अमरावती, अहमदनगर, बीड इत्यादी ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय निलपत्रेवार हे अधिक तपास करीत आहेत.