दौंड : केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन प्रशासनाच्या दक्षतेमुळे दोन जुळ्या अर्भक मुलींचे प्राण वाचले. शिरूर येथे १४ नोव्हेंबर रोजी जान्हवी हॉटेलच्या समोर एका व्यक्तीला सदरची अर्भके दिसली. एका साडीमध्ये सदरच्या मुली गुंडाळण्यात आल्या होत्या. रात्रीची वेळ असल्याने मुली थंडीने गारठल्या होत्या.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांची अवस्था मरणासन्न झाली होती. अर्भक मुलींना रमाबाई मुक्ती मिशन केंद्रामध्ये दाखल केले.
केडगाव येथील प्रशासनाच्या वतीने याबाबत तत्काळ दाखल करून त्यांना प्रथमोपचार करण्यात आले. मुलींच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्या दगावण्याची शक्यता निर्माण झाली. पंडिता रमाबाई मुक्ती प्रशासनाने याबाबत शिरूर पोलिसांना माहिती दिली. मुलींना शहरांमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले. चार दिवस मुलींवर उपचार केल्यानंतर पुणे येथील महिला जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या वतीने या मुलींना पुन्हा पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्रामध्ये दाखल केले..मुलींची तब्येत ठणठणीत असल्याचे मत येतील छाया म्हकाळे यांनी व्यक्त केले.