पुणे : स्त्री जातीचे अर्भक जन्मला आल्यानंतर त्याला एका सामाजिक संस्थेच्या दारात फेकून परित्याग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात संबंधित अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिषा शिंदे (४९, रा. वडगावशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिषा शिंदे या चिल्ड्रन एचआरए म्हणून वडगावशेरी येथील प्रेमनगर येथे असलेल्या माहेर संस्थेत काम पाहतात. बुधवारी (ता. २४) रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांना नव्याने जन्माला आलेले दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक टी शर्टमध्ये गुंडाळून संस्थेच्या गेटवर सोडून दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक माने पुढील तपास करत आहेत.