पुणे : ‘भाजपा एक धोका है, देश बचालो मौका है,’ ‘पेट्रोल भाज्यांनी रडवले रे, अच्छे दिन आणणाºयांनी फसवले रे,’ ‘महागाई वाढली बुलेट टेÑनच्या वेगाने’ ‘कधी येणार अच्छे दिन’ आणि ‘एवढी लाटणी कशाला, भाजपाला ठोकायला’ अशा खास शिवसेना स्टाईल घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणून गेला. वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी आयोजिण्यात आलेल्या लाटणे मोर्चामध्ये हजारो महिला व शिवसैनिक सहभागी झाले होते. बैलगाडीवर अन्नधान्य, गॅस सिलिंडर आणि तेलाचे डबे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहून नेण्यात आले.केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दूध, तेल, साखर, पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस आदींच्या भाववाढीमुळे जनता त्रस्त झालेली असून भाज्याही कडाडत चालल्या आहेत. शिवसेनेच्या वतीने मंगळवारी भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाला ‘लाटणे मोर्चा’ असे नाव देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिकांनी आक्रमकपणे घोषणाबाजी केली. काही महिलांनी यावेळी महागाईवर पथनाट्य सादर करीत सर्वसामान्यांना तोंड द्याव्या लागणाºया समस्यांबाबत बोचºया शद्बात टीकाही केली. मोर्चेकºयांमध्ये ‘महागाईचा भस्मासुर’ नावाचा एक राक्षस बनून आलेल्या शिवसैनिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोºहे, शहराध्यक्ष विनायक निम्हण, गटनेते संजय भोसले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहर संघटक श्याम देशपांडे, बाबा धुमाळ, दत्ता टेमगिरे, महिला आघाडीच्या तृष्णा विश्वासराव, निर्मला केंडे, कीर्ती फाटक, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, संजय मोरे, युवा सेनेचे किरण साळी आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाल्याने विधान भवन, साधू वासवानी चौक, ससून रुग्णालय या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीझाली होती.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. मोर्चासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जनतेच्या हितासाठी रस्त्यावर : सामंतपेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भाजपप्रणीत केंद्र शासन जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरले आहे. मागील युती शासनाच्या काळात हे दर स्थिर ठेवण्यात आलेले होते.सद्य:स्थितीत महागाई वाढत चालल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले असून जगणे अवघड झाले आहे. जनतेमध्ये महागाई आणि सरकारविरुद्ध आक्रोश वाढत चालला असून सत्तेचा घटक असलो तरी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडल्याचे मत या वेळी उदय सामंत यांनी मांडले.
महागाईची बुलेट ट्रेन; शिवसैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:26 AM