शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

महागाईचा फटका छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना; वडापाव, पराठ्यासह पदार्थांच्या वाढल्या किमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:00 IST

नववर्षातच हॉटेलसह हातगाड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदार्थांच्या किमतीत वाढ केल्याचा फटका खवय्यांना बसणार आहे.

पुणे : शनिवार-रविवार आला की पुण्यातील विविध भागांतील रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि हातगाड्यांवर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र पुणेकरांना आता जिभेचे लाड थांबवावे लागण्याची शक्यता आहे. कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नववर्षातच हॉटेलसह हातगाड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदार्थांच्या किमतीत वाढ केल्याचा फटका खवय्यांना बसणार आहे.

तांदूळ, गहू, ज्वारी किंवा कडधान्याचे भाव वाढले, तर हॉटेल व्यावसायिकांना काय फरक पडतो? त्याचा भार तर ग्राहकांच्या खिशाला पडतो. असे मानले जात होते. मात्र सर्वसामान्यांप्रमाणे महागाईचा फटका हॉटेल व्यवसायालादेखील बसत आहे. मागील महिन्यांपासून एक महिन्यांच्या कालावधीत कडधान्यांमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांचे दरही प्रती किलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत, तर तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींनी शंभरी पार केली आहे. इतकेच काय तर तेलाचे भाव २ ते ३ रुपयांनी काहीसे कमी झाले असले तरी तेलाचे भाव ही १ लिटर १४० ते १४५ रुपये झाले आहेत. कांद्याच्या भाववाढीने हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.भाजी किंवा वडापाव भाजी या पदार्थांमध्ये कांदा लागत असल्याने छोट्या व्यावसायिकांनी वडापावच्या दरात ३ ते पाच रुपयांनी वाढ केली आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे ५ ते ७ रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. खाणावळीमध्येही काही पदार्थ महागले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.

खानावळीचे दर वाढले :

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतात हॉटेल व खानावळ तसेच घरगुती खानावळ चालकांनी दरात वाढ केली असून, हे दरवाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आता घरगुती खानावळीमध्ये जेवण करणे अवघड झाले आहे. घरगुती खानावळ राइस प्लेट दर ७० वरून ९० रुपये, तर हॉटेलमधील ११० रुपये १३० रुपये झाल्याने वाढत्या महागाईला सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 

महागाईचा फटका हॉटेल व्यावसायिकांनादेखील बसला आहे. ४ ते ५ टक्क्यांपर्यंतची महागाई हॉटेलचालक सहन करू शकतात. मात्र सध्या १० ते १५ टक्क्यांनी गोष्टी महागल्या आहेत. कडधान्ये, पालेभाज्या महाग झाल्या असून, हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा. सध्या कांद्याचे भावदेखील वाढलेले आहेत. बटाट्यांच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने हॉटेलचालकांना हे परवडणारे नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये दर वाढ करणे हाच पर्याय आहे. - गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशन

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMahayutiमहायुतीfoodअन्नOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पInflationमहागाई