निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे; अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 02:43 PM2023-05-21T14:43:46+5:302023-05-21T14:44:07+5:30

आगामी निवडणुकांमध्ये महागाई, बेरोजगारीचे प्रश्न असे मुद्दे प्रभावी ठरणार

Inflation should be kept in mind when pushing the button in elections Ajit Pawar criticizes the rulers | निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे; अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे; अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

googlenewsNext

बारामती : महागाई कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी, म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. कुठे बटन दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्किल शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वाढत्या महागाईवर सत्ताधाऱ्यांना चिमटे घेतले.

बारामती येथे रविवारी (दि. २१) ज्येष्ठ नागरिक निवास  येथील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्ष इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, येथील एका कक्षाचे बांधकाम ५० हजारात पूर्वी झाले होते. मात्र त्याच्या नुतनीकरणासाठी ३ लाख रूपये खर्च आला. महागाई कशी वाढत चालली आहे. हे तुमच्या लक्षात रहावे यासाठी मी सांगतो आहे. त्यामुळे येथून पुढे बटन दाबताना महागाई लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी येणाऱ्या  निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचे सुतोवाच केले. ते पुढे म्हणाले,  देशासमोर महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, देशाची लोकसंख्या वाढली आहे. चीनला देखील लोकसंख्येच्या बाबतीत आपण मागे टाकले आहे. तरूणांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्येष्ठांची संख्या देखील वाढली आहे. घरामध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही मेडीकल इमर्जन्सी आली तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र उपयुक्त आहे, असेही पवार म्हणाले.

अजितदादांनी घेतली सुनेत्रावहिनींची फिरकी...

बोलण्याच्या ओघामध्ये अजितदादांनी लोकसंख्येचे प्रमाण व त्यातील तरूणांचा टक्का व ज्येष्ठांचा टक्का किती प्रमाणात आहे. याची माहिती दिली. ‘सध्या भारतात तरूणांची संख्या मोठी आहे, भारतियांचे सरासरी आर्युमान २८ वर्षे इतके आहे. देशात ६० पेक्षा जास्त ज्येष्ठांची संख्या १० टक्के आहे. देशात १३ कोटी ५० लाख  लोकं ६० वर्षांच्या पुढची आहेत. यामध्ये अजित पवारचा सुद्धा नंबर लागतो आणि लवकरच सुनेत्राचा सुद्धा लागणार आहे, या वाक्यावर सुनेत्रावहिनींनी हसुन दाद दिली. तर उपस्थिांमध्ये देखील खसखस पिकली.

चपटीसाठी विकले पुलाच्या संरक्षक कठड्यावरील भाले...

विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठवड्यातून एकदातरी बारामतीतील विकासकामांची काळजीपूर्वक पहाणी करत असतात. बाबूजी नाईकवाड्या जवळील नदीपात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी नविन पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचे नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र आज हा पुल पाहताना अजित पवार यांना यातील  भाले गायब झाल्याचे लक्षात आले. याबाबत येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘येथील सुरक्षारक्षक भिंतीवर लोखंडी ग्रील बसवले आहे. व त्यावर भाले काढले होते. यातील सगळे भाले चोरीला गेले. मी म्हणालो हे कोण घेऊन जातो. तेंव्हा एकाने सांगितले दादा एक भाला काढला की शंभर रूपये मिळतात. शंभर रूपये मिळाले की ५० रूपयाला एक दारूचा तुकडा म्हणजे चपटी मिळते. एका भाल्यात दोन चपट्या मिळतात. त्याचं भागतं. आपण करतोय काय कशाचा कशाला मेळ नाही, असा किस्सा आज अजित पवार यांनी सांगितला. नविन  बसस्थानकाचे काम सध्या सुरू आहे. येथे मात्र जे चोरता येणार नाही. ते करण्याचा प्रयत्न करतोय. जीवात जीव असे पर्यंत बारामतीकरांचे भलेच करणार असेही यावेळी अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Inflation should be kept in mind when pushing the button in elections Ajit Pawar criticizes the rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.