येथील आठवडे बैल बाजार जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध बैलबाजार आहे. या बाजाराबरोबरच शेळी-मेंढीचा बाजार, तरकारी बाजार, तसेच कडधान्य बाजार मोठा भरतो. या ठिकाणी संगमनेर, नाशिक, लासलगाव, कल्याण आदी ठिकाणांहून शेतकरी व व्यापारी बैल खरेदी-विक्रीसाठी येतात. या प्रसिद्ध असणाऱ्या बैल बाजारात गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्रीसाठी येतात. या बैल बाजारात बैलांची आवक वाढली होती. मात्र बैलांचा खप हा अत्यंत कमीच होता. बैलांचे भावही मात्र कमीच होते. गेले काही दिवसांपासून या बैल बाजारात बैलांना जास्त भाव मिळतच नाही. बैलगाडा शर्यती चालू झाल्याशिवाय बैल बाजारात आवक वाढणार नाही. तसेच भावही मिळणार नाही असे अनेक व्यापारी व शेतकऱ्यांनी सांगितले.आजच्या बैल बाजारात खिल्लारी बैल जोडीचे भाव ४० ते ४५ हजार रुपये, तर गावठी बैलजोडीचे भाव ३५ ते ४० हजार रुपये होते. शेतकरीवर्ग शेतीच्या कामासाठी बैल खरेदीसाठी आले होते. शेतकरी व व्यापारी लहान गोऱ्हे खरेदी करत होते. कोरोनामुळे लांबून शेतकरी व व्यापारी आले नव्हते. आता यांत्रिकीकरणावर शेतकरी वर्गाचा भर असून त्यामुळे बैल खरेदीसाठी बाजारात शेतकरी कमी येतात. आजच्या बैल बाजारात बैल ३२३ आले तर १८४ विकले.तसेच शेळ्या २४० आल्या तर १३२ विकल्या, तर म्हैशी ९९ आल्या तर ८४ विकल्या गेल्या. आजही बैल बाजारात हातावर रुमाल टाकून व्यवहार केला जात आहे. तसेच ठोकण,दला,मेटा,उनी,सुती,डुगरा, कपठुकणी,हातुर,उनाबट,जोडअसर,आयवत,एकण अशा सांकेतिक भाषेचा वापर केला जातो.
शेतकरी प्रतिक्रिया-
(१)बाजीराव शिंदे (सावरगाव)-
यावर्षी पाऊस थोडाफार पडला आहे.तसेच शेतीच्या कामासाठी बैल लागतात.
व्यापारी प्रतिक्रिया-
(२) काशिनाथ नवले- (नळावणे)- शेतीच्या कामासाठी बैल लागत असल्याने बैलखरेदीसाठी व विक्रीसाठी आलो आहे. चारा-पाणीही उपलब्ध आहे.
130921\20210913_095843.jpg
बेल्हा(ता.जुन्नर)येथील प्रसिद्ध आठवडे बैल बाजारात बैलांची आवक वाढलेली दिसत आहे.