आळेफाटा : चक्रीवादळामुळे आळेफाटा उपबाजारात मंगळवारी कांदा आवक घटली. तर चांगल्या प्रतीच्या कांद्यास प्रती दहा किलो १६० रुपये दर मिळाला असल्याचे सभापती संजय काळे उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले.
आळेफाटा उपबाजारात या महिन्याचे सुरुवातीपासून कांदा आवक वाढली होती. मंगळवार, बुधवार व रविवार या दिवशी होणारे कांदा लिलावात जवळपास २२ हजारांच्या वर कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. मात्र, आज मंगळवारी आवक निम्म्याने घटली. चक्रीवादळ व पावसाची हजेरी यामुळे आवकेवर परिणाम झाला. १३ हजार चारशे गोणी विक्रीस आल्या असल्याचे कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो मिळालेले दर असे एक नंबर कांदा १४० ते १६० रूपये, दोन नंबर कांदा १०० ते १४० रूपये, तीन नंबर कांदा -७० ते १०० रूपये भाव