मुंढवा: हडपसर विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रमेश राऊत यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अशासकीय समितीवर निवड करण्यात आली. हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी कॉंग्रेसचे शोएब इनामदार व माजी नगरसेवक विजय देशमुख उपस्थित होते.
अध्यक्षपदी विजय डाको
कर्वेनगर : क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचा अध्यक्षपदी विजय डाकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या योजनांचा लाभ गरजुंना मिळवून देणार असल्याचे विजय डाकले यांनी निवडीचे पत्रक स्वीकारताना सांगितले आहे.
कोरोना काळातील आर्थिक नियोजन विषयावर वेबिनार
औंध : जादू गिनिंची आर्थिक साक्षरता प्रत्येकासाठी या प्रकल्पांतर्गत
कोरोना दरम्यान व नंतर आर्थिक जागरुकतेची गरज या विषयावर
यू ट्युब लाईव्ह वेबिनार आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या
मॉडर्न कॉलेज गणेशखिंड येथील प्रा. डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी अतिशय
अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. मंजूषा कुलकर्णी आर्थिक जागरूकतेबाबत मार्गदर्शन
करताना म्हणाल्या, भारतात साक्षरतेचे प्रमाण जास्त असले तरी आर्थिक
साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने कोरोना काळात बहुतेक लोक संकटांना
सामोरे जाण्यास आर्थिकदृष्ट्या कमी पडले. प्रत्येकाला उत्पन्न,खर्च,बचत
आणि गुंतवणूक याचा ताळमेळ घालता आला पाहीजे. बचत योग्य ठिकाणी
करता आली पाहीजे. बचतीच्या वेगवेगळ्या पर्यायांची त्यांनी यावेळी सविस्तर माहीती दिली.