पुणे : दिवसेंदिवस पर्यावरणात बदल होत आहे. आसपासचे वन्य,प्राणीजीवन यावर त्याचा आमुलाग्र परिणाम होत आहे. या सगळयात पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत अशा चळवळीत लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे आता लोक त्यात यायला तयार आहेत. मात्र, त्याकरिता त्यांच्यापर्यंत पोहचण्यची आवश्यकता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देत त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधावा लागेल, असे मत पक्षीतज्ञ, पर्यावरणप्रेमी प्रा.डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले. आरबीएस (रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड) कंपनीचे इनोव्हेशन आणि ऑपरेशन केंद्र असलेल्या आरबीएस इंडिया कंपनीने यांच्यावतीने इला फाऊंडेशनला नुकतेच ‘अर्थ हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक डॉ. पांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार सोहळा दिल्लीत पार पडला. यानिमित्ताने संवाद साधण्यासाठी व पुरस्काराविषयीची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आरबीएस फाऊंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरबीएस इंडियाचे सस्टेनिबिलीटी प्रमुख एन. सुनील उपस्थित होते. पांडे म्हणाले, आगामी काळात लहान मुले, तरुण यांना डोळ्यासमोर ठेऊन पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमांची मांडणी करावी लागेल. सध्या शहरी भागापेक्षा खेड्यात पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता अधिक प्रगल्भ असल्याची जाणवते. ती आणखी जोपासण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. डॉ. पांडे यांनी नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत एका पर्यावरणविषयासंबंधी सामंजस्य करार केला आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांना माती, पाणी, याबरोबरच सेंद्रीय, असेंद्रीय रसायने त्याचा होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तापमानात झालेला बदल, त्याचा दैनंदिन जीवनमानावर होणारा परिणाम तसेच पर्यावरणातील विविध घटकांचा होणारा -हास या गोष्टी पुरस्कारात विचारात घेतल्या जातात. पर्यावरणाबाबत गांभीर्याने विचार करुन नवीन काही घडवू पाहणा-यांना बळ देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. यासाठी केवळ जंगलेच नव्हे तर दुर्गम भागातील खेड्यापर्यत पोहचून तेथील पर्यावरण समजून घेण्याकरिता सहकार्य केले जाते. गतिमान विज्ञान तंत्रज्ञानाची पावले ओळखुन पर्यावरणाचा शाश्वत विकास तेवत ठेवण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येते, असे एन. सुनील यांनी या वेळी सांगितले.
* आरबीएस अर्थ हिरोज पुरस्कार 2019 चे विजेतेविजेते ठिकाण पुरस्कार विभाग
प्रमिला बिसोई ओडिशा जीवन गौरव भुलो अबरार खान राजस्थान ग्रीन वॉरियर दिम्बेश्वर दास आसाम ग्रीन वॉरियर ऐश्वर्या माहेश्वरी उत्तरप्रदेश सेव द स्पेशिजएस सतीश तामिळनाडू सेव द स्पेशिजजलाल उद दीन बाबा काश्मिर इन्स्पायर