शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

विद्यार्थी पोहोचविणार शासकीय योजनांची माहिती, युवा माहिती दूत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 5:16 AM

राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती थेट लाभार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी करणार आहेत.

पुणे : राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती थेट लाभार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी करणार आहेत. त्यासाठी येत्या १ आॅगस्टपासून ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना किमान १ कोटी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना दिल्या आहेत.युवा माहिती दूत उपक्रमाचे स्वरूप, कार्यपद्धती व आवश्यकता स्पष्ट करणाºया माहितीचा मसुदा उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी कार्यवाही करावी. या कार्यवाहीचा अहवाल सात दिवसांत पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाकडे सादर करावेत, असे सहसंचालक विजय नारखेडे यांनी स्पष्ट केले आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थी सर्वमाहिती लाभार्थी व नागरिकांना समजावून सांगतील. युवा माहितीदूर पुढील ६ महिने कार्यरत राहणार आहेत. यामध्ये सहभागी होणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयाने युवा माहितीदूत मार्गदर्शक म्हणून एका प्राध्यापकांची नियुक्ती करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.५ ते ६ टक्के विद्यार्थ्यांचा सहभागराज्यात ६ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. यात सुमारे २३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान ५ ते ६ टक्के विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांना समाजकार्याची आवड आहे, त्यांचा प्राधान्याने यात समावेश करावा अशी सूचना परिपत्रकात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी