शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

शेतक-यांचे पैसे थकविणा-या कारखान्यांचे परवाने रोखले, साखर आयुक्त संभाजी-कडू पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:29 AM

बहुतांश साखर कारखान्यांविरुद्ध ऊस उत्पादक शेतक-यांनी तक्रारी केल्या असून शेतक-यांचे रास्त आणि किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) होणारे पैसे थकविणा-या राज्यातील अकरा साखर कारखान्यांचे गाळप परवाने रोखण्यात आले आहेत.

पुणे : बहुतांश साखर कारखान्यांविरुद्ध ऊस उत्पादक शेतक-यांनी तक्रारी केल्या असून शेतक-यांचे रास्त आणि किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) होणारे पैसे थकविणा-या राज्यातील अकरा साखर कारखान्यांचे गाळप परवाने रोखण्यात आले आहेत. थकीत एफआरपीची पूर्ण रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशा नोटिसा कारखान्यांना बजावण्यात आल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त संभाजी-कडू पाटील यांंनी दिली. यंदा दोन नव्या साखर कारखान्यांचा ‘चाचणी हंगाम’ घेतला जाणार आहे.येत्या काही दिवसांत राज्यातील १७५ च्या आसपास कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये गाळप हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी कारखान्यांना आॅनलाइन परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यभरातून आलेल्या १९१ अर्जांपैकी ११६ कारखान्यांना हे परवाने देण्यात आले आहेत, तर जवळपास ८० कारखान्यांच्या परवाना प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांचे थकीत पैसे देण्यासाठी ‘महसुली वसुली प्रमाणपत्र’ नियमान्वये कारखान्यांच्या मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध कारखान्यांनी न्यायालयात धाव घेतली. या कारखान्यांची एफआरपी वितरित करण्यात आलेली नाही. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार १५ आॅक्टोबरपर्यंत १४ कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नव्हती. एफआरपीची रक्कम वितरित केल्यानंतरच यंदाच्या हंगामाचा गाळप परवाना देण्यात येणार आहे.एफआरपी थकलेले कारखाने : भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर : दौलत साखर कारखाना (खासगी), सांगली : यशवंत शुगर खानापूर (खासगी), सातारा : रयत सहकारी साखर कारखाना, सोलापूर : बबनरावजी शिंदे शुगर्स (खासगी), जळगाव : चोपडा सहकारी साखर कारखाना, जालना : समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट एक आणि युनिट दोन, हिंगोली : पूर्णा सहकारी साखर कारखाना, नांदेड : एच. जे. पाटील सहकारी कारखाना आणि शंकर वाघल वाडा सहकारी साखर कारखाना.

टॅग्स :Puneपुणे