पुणे : खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक पंपिंग स्टेश्न बसविण्यात आली आहे. थेट धरणातून कोणत्या पंपिंग स्टेशनमधून किती पाणी उचले जाते, याची आधुनिक यंत्राद्वारे माहिती उपलब्ध होत. आम्ही ऐवढे पाणी सोडले, महापालिका जास्त पाणी उचलते, अशी टोलवाटोलवी करण्याची कोणतीही संधी महापालिका अथवा पाटबंधारे विभागाला मिळत नाही. या आधुनिक पंपिंग स्टेशनमुळे महापालिकेची अधिक पाणी उचलत असल्याचे पितळ उघडे पडल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले.महापालिका मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याने व सांगूनदेखील पाणी उचले न थांबविल्याने अखेर बुधवार (दि.१०) रोजी पाटबंधारे विभागाने पोलिसांची मदत हेऊन महापालिकेचे चार पैकी तीन पाणी पंपिंग पंप बंद केले. पाटबंधारे विभागाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे येरवडा, वडगावशेरी, चंदननगर, खराडी म्हणजे पुण्याच्या पूर्व भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. लष्कर परिसरालाही पाणी मिळाले नाही. पंप आता सुरू झाले असले तरीही पाणी पुरवठा सुरळीत व्हायला वेळ लागेल. त्यामुळे शुक्रवारी या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. आम्ही एवढे पाणी उचलत नसून, पाटबंधारे विभाग कालव्यातील गळतीदेखील महापालिकेच्या कोटा गृहीत धरत असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. तर महापालिकेला प्रतिदिन १३५० एमएलडीची पाणी उचलण्याची परवानगी असताना दररोज १६५० ते १७०० एमएलडी पाणी उचलते, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.‘लोकमत’च्या वतीने खडकवासला धरणावर प्रत्यक्ष जाऊन कोणत्या पंपिंग स्टेशनमधून किती पाणी उचले जाते याची पाहणी केली. यामध्ये महापालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या आधुनिक ‘कोपरा कोढी नवीन पंपिंग स्टेशन, वारजे-माळवाडी पंपिंग स्टेशनआणि बंद जलवाहिनीची पाहणी केली असता येथे बसविण्यात आलेल्या आधुनिक यंत्रणेमुळेप्रत्येक पंपिंग पंपमधून कितीपाणी उचले जाते, याची सर्वमाहिती संगणकावर सर्व आकडेवारीसह त्वरित उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले.पाणी वाढवून देण्याऐवजी कपात : कालवा फुटीमुळे झाली महापालिकेची अडचणमहापालिकेने खडकवासला धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्वती जलकेंद्रापर्यंत बंद पाईप लाईनचे काम केले आहे. तेथून पाणी उचलले जाते. परंतु लष्कर जलकेंद्रासाठी अद्यापही महापालिकेला पाटबंधारे विभागाच्या मुठा उजव्या कालव्यावरच अवलंबून राहावे लागते.पर्वती जलकेंद्रातून पाणी कालव्यात सोडून लष्कर जलकेंद्रापर्यंत पाणी पोहचविले जाते. ६०० एमएलडी पैकी ४५० एमएलडी पाणी कालव्यात सोडले जाते. परंतु, गळतीमुळे केवळ २४० एमएलडी पाणीच पोहचते. यामुळे अधिकचे पाणी उचलावे लागत असल्याचा महापालिकेचा दावा आहे.समाविष्ट ११ गावे, ग्रामपंचायती यांनाही महापालिकेलाच पाणी द्यावे लागते. त्यामुळे सध्याचे १ हजार ३५० एमएलडी पाणीच वाढवून मिळावे, अशी महापालिकेची गेल्या काही वर्षांपासूनची मागणी आहे. पाणी वाढवून देणे दूरच राहिले, आहे त्याच पाण्यात जलसंपदाने कपात केली आहे.जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे गुरुवारी सकाळी महापालिकेत आले होते. जलसंपदाने पुण्याच्या पाणी पुरवठ्याचे पंप बंद केले याची त्यांना माहितीच नव्हती. ही माहिती समजताच त्यांनी पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द केली. तरीही पत्रकारांनी त्यांना गाठून याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘महापालिका १ हजार ७०० एमएलडी पाणी वापरते. त्यामुळे पाणी कपात केली आहे.’’ शिवसेनेचा या कपातीला विरोध आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधल्यानंतर उगीचच टीआरपी वाढवू नका, असे सांगत त्यांनी यातून समन्वयाने मार्ग काढू असे सांगितले.
आधुनिक पंपिंग स्टेशनमुळे पालिकेचे पितळ उघडे;पाणी उचललेल्याची आकडेवारीसह संगणकावर माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 6:03 AM