शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मिळकतींची माहिती एका क्लिकवर, शहरातील इमारतींची १९५२ पासूनची मोजमापे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:30 AM

महापालिकेच्या मिळकत कर विभागाने तब्बल ३२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग केले आहे. त्यामुळे आता शहरातील साडेआठ लाख मिळकतींच्या क्षेत्रफळांसहित सर्व लांबीरुंदीची माहिती या विभागाला केवळ एका क्लिकवर मिळेल.

पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने तब्बल ३२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग केले आहे. त्यामुळे आता शहरातील साडेआठ लाख मिळकतींच्या क्षेत्रफळांसहित सर्व लांबीरुंदीची माहिती या विभागाला केवळ एका क्लिकवर मिळेल. याशिवाय, या विभागाने जवळपास ७० टक्के कामकाजाचे संगणकीकरण केले असून या वर्षी आतापर्यंतच्या एकूण करापैकी तब्बल ४० टक्के कर आॅनलाईन पद्धतीने जमा होत आहे.वर्षभरापासून महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे संगणकीकरण सुरू आहे. पैसे जमा करून घेण्यापासून ते मिळकती शोधण्यापर्यंत प्रत्येक कामात संगणकाचा वापर होत आहे. आता वर्षभरानंतर त्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागले आहेत. शहरातील सन १९५२पासूनच्या सर्व मिळकतींची (इमारतींची) सविस्तर मोजमापे महापालिकेच्या दप्तरी कागदपत्रांच्या स्वरूपात होती. त्या जवळपास ३२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या मिळकत कर विभागातील निरीक्षकांना कोणत्याही मालमत्तेचे जुने मोजमाप त्यांच्या मोबाईलवरही मिळू शकते.मिळकतीत काही वाढीव बांधकाम झाले असेल किंवा बदल केला गेला असेल, तर तोही अपडेट करून घेतला जातो. नव्या मालमत्तांची माहितीही त्यात नियमितपणे जमा करता येते. मोजणीसंबंधीचे बहुतेक वाद त्यामुळे कमी होत आहेत असा, निरीक्षकांचा अनुभव आहे.याशिवाय, महापालिकेने शहरातील ८ लाख ५० हजारांपैकी सुमारे ७ लाख मिळकतधारकांचे मोबाईल क्रमांक, मेल आयडी जमा केले आहेत. त्यामुळे कोणाचा कर थकला किंवा जमा करण्याची तारीख जवळ आली असेल, तर त्यांना लगेचच मेलवर व मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो. कर जमा करणाºयांनाही कर जमा झाला म्हणून मोबाईलवर संदेश पाठविला जातो.या सुविधेमुळेही कर जमा करणाºयांच्या संख्येत चांगलीवाढ झाली आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख उपायुक्त सुहास मापारी यांनीदिली. वेळेवर लक्षात आणून दिल्यामुळे सुरुवातीच्या तीन महिन्यांतच कराचा सुमारे ३० टक्के भाग जमा होत असल्याचे मापारी यांनी सांगितले.आॅनलाईन पद्धतीने कर जमा करण्याचीही सुविधा मिळकत कर विभागाने नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे संबंधित कार्यालयात जाणे, रांगेत उभे राहणे, त्यात वेळ घालवणे वाचले आहे. या वेळी आतापर्यंत जमा झालेल्या ७२५ कोटी रुपये करापैकी सुमारे ४०० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने जमा झाल्याची माहिती मापारी यांनी दिली.याशिवाय, धनादेशाद्वारेजमा करण्यात येणारी रक्कम वेगळीच आहे. तीही साधारण १०० कोटी रुपयांच्या आसपासआहे. म्हणजे एकूण जमा रकमेपैकी ५०० कोटी रुपये रोखीने नाही,तर धनादेश किंवा आॅन लाईन पद्धतीने जमा झाले आहेत.हे प्रमाण मागील वर्षी अगदीच नगण्य होते. त्यात आता बरीचमोठी वाढ झाली आहे. अजूनही अनेक मिळकतदार आॅनलाईन पद्धतीने कर जमा करीत आहेत, असे मापारी यांनी सांगितले.उपग्रहाद्वारे मालमत्तांची मोजणी१ जीआयएस मॅपिंगद्वारे उपग्रहाच्या साह्याने शहरातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख मिळकती तपासून झाल्या आहेत. त्यात सुमारे ४० हजार मिळकतींनी वाढीव बांधकाम केले आहे; पण त्यांना कराची रक्कम मात्र जुन्याच मोजमापाने पाठवली जात आहे, असे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची नव्याने प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी जाऊन नव्याने मोजमापे केली जातात.२ यातून मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असे मापारी यांनी सांगितले. शहरातील सर्व म्हणजे ८ लाख ५० हजार मालमत्ता या पद्धतीने तपासण्यात येणार असून, त्यातून मालमत्तांच्या संख्येत तर वाढ होईलच; शिवाय उत्पनातही सुमारे ४०० कोटी रुपयांची वाढ होईल, असा विश्वास मापारी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका