शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

C-DAC | जंगलातील वणवा २ दिवसांनंतर कसा पसरणार तेही कळणार, सीडॅकतर्फे तंत्रज्ञान विकसित

By प्रशांत बिडवे | Published: March 21, 2023 6:14 PM

सी-डॅकच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजाच्या फायद्यासाठी विकसित केलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली...

पुणे : जंगलात वणवा पेटल्याने वनसंपत्तीचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते तसेच प्राण्यांनाही जीव गमवावा लागताे. वणवा पेटल्यानंतर ताे पुढील ४८ तासांत जंगलातील काेणत्या क्षेत्रात कसा पसरेल आहे याची संभाव्य माहिती देणारे तंत्रज्ञान सी-डॅकसह देशातील इतर संशाेधन संस्थांनी मिळून विकसित केले आहे.  सिक्कीम राज्यात जंगलात सिस्टिमचा प्रयाेग यशस्वी झाला असून त्यामुळे वणव्यामुळे हाेणारे वनसंपत्तीचे संभाव्य नुकसान टाळण्यास  मदत हाेणार आहे अशी माहिती सी-डॅकचे कार्यकारी संचालक निवृत्त कर्नल ए.के. नाथ यांनी दिली.

पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र सी-डॅकच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजाच्या फायद्यासाठी विकसित केलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सीडॅकचे महासंचालक ई.मगेश यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले.

सी- डॅक सह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, खरगपूर, आणि  डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नाॅलाॅजी  सिक्किम यांनी मिळून ‘ फाॅरेस्ट फायर स्प्रेड सिम्युलेशन युसिंग हाई परफाॅर्मन्स कॅम्प्युटिंग सिस्टीम’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जंगलात वणवा पेटताच  उपग्रह तसेच वनअधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिल्यानंतर ही सिस्टिम पुढील ४८ तासात वणवा जंगलात कसा पसरू शकताे याची पूर्वकल्पना वन सर्वेक्षण विभागाला वेळाेवेळी देईल त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने आग अटाेक्यात आणणे आणि जीवितहानी हाेउ नये यासाठी खबरदारी घेणे साेपे हाेणार आहे. सिक्किम राज्यातील जंगलात दि. २६ ते २८ जानेवारी या कालावधीत या तंत्रज्ञानाचा प्रयाेग यशस्वी झाला आहे. देशातील विविध जंगलातील वनसंपत्तीचा अभ्यास करून त्यानुसार तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. कशी हाेणार तंत्रज्ञानाची मदत  -  वणव्यामुळे संकटात सापडणाऱ्या नागरिकांची वेळीच सुटका करीत जीवितहानी कमी करणे- अग्निशमन यंत्रणेचा प्रभावी वापर करीत पसरणारी आग अटाेक्यात आणणे

सायबर धाेके परतावण्यासाठी हनीपाॅट फ्रेमवर्क विकसितसायबर धाेक्यांचे निरीक्षण, विश्लेषण  करणे तसेच त्यावर उपाय करण्यासाठी सी-डॅकने ‘हनीपाॅट फ्रेमवर्क’ विकसित केले आहे. देशातील दाेन हजार पेक्षा जास्त संस्थांमध्ये हे तंत्रज्ञान कार्यान्वित केले आहे. तसेच  वातावरणातील हल्ले समजून घेण्यासाठी सीआय सुरक्षा प्रशिक्षण किट तयार केली आहे. 

साॅफ्टवेअर सिक्युरिटीवर ऑनलाईन काेर्ससंगणक अभियंत्यासाठी सीडॅकच्या वतीने साॅफ्टवेअर सिक्युरिटी वर ऑनलाईन काेर्स सुरू करण्यात आला आहे. हा काेर्स सशुल्क असून दाेन महिने कालावधीत तीस तासांमध्ये विविध ९ माॅड्युल्स शिकविले जातील. अधिक माहितीसाठी  https://meghsikshak.in/chariot/ या संकेतस्थळास भेट द्यावी. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDefenceसंरक्षण विभाग