शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

गावठाणांच्या मोजणीसाठी पुढाकार

By admin | Published: November 27, 2015 1:41 AM

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्याचा जिल्हा परिषदेचा विचार असून, त्याचाच एक भाग म्हणून गावागावांतील प्रॉपर्टीचे वाद मिटविण्यासाठी जिल्ह्याती

पुणे : स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्याचा जिल्हा परिषदेचा विचार असून, त्याचाच एक भाग म्हणून गावागावांतील प्रॉपर्टीचे वाद मिटविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांतील गावठाणांची मोजणी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी जिल्हा परिषदेने स्थायी समिती सभेत तत्त्वत: मंजूर करून घेतला. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत घेऊन शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले.शासनाच्या सिटी सर्व्हे या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त असलेल्या ४०० गावांत आतापर्यंत गावठाणांची मोजणी करण्यात आलेली आहे. जिल्हात १,४६३ गावठाणांची मोजणी झालेली नाही. त्यात शासन जिल्हा परिषदांना बांधकाम नोंदीचे अधिकार देण्याच्या तयारीत आहे. या गावांत गावठाणेच निश्चित झाली नाहीत, तर नोंदी कशा घ्यायच्या, हा प्रश्न आहे. तसेच, ही मोजणी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रॉपर्टीवरून मोठे वाद होत असतात. तसेच, अतिक्रमणही झाले. जिल्ह्यात ग्रुप ग्रामपंचायती होत्या. आता त्या वेगळ््या होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या आहेत. त्यांना गावठाणच नाही. त्या ग्रामपंचायतींनी गावठाण जाहीर करावे, असे प्रस्ताव पाठविले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेने शासनाचीच गावठाण मोजणीची मोहीम पुढाकार घेऊन वेगळ्या पद्धतीने कशी राबविता येईल, याचा प्र्रस्ताव तयार केला आहे. आज झालेल्या स्थायी समिती सभेत या प्रस्तावाचे भूमीअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. मुख्याधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तयार केला असून त्याला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. शासन २ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांतील गावठाणाची मोजणी करीत आहे. जिल्हा परिषदेने यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांचीही गावठाण मोजणी करण्याचे ठरविले आहे. एका गावासाठी साधारण १ हजार २०० रुपये खर्च येतो. याप्रमाणे सर्व गावांतील मोजणी करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मोजणीसाठीचा खर्च शासन देते; मात्र एकाच वेळी ऐवढा निधी शासन देणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपात ५ ते १० कोटी स्व निधीतून दिले, तर ही मोजणी मोठ्या प्रमाणात करता येईल. गावांच्या मोजणीतून फी स्वरूपात येणारे पैसे जमा करून जिल्हा परिषदेचा निधी ९० टक्के तरी परत मिळू शकतो. त्यातून पुन्हा पुढच्या टप्प्यातील गावे घेता येतील. ही फी गोळा करण्याची रितसर परवानगी शासनाकडे मागितली जाणार आहे. शासनाने यास मंजुरी दिली तर जिल्हातील गावागावांत प्रॉपर्टीवरून होणारे वाद यामुळे मिटतील. हा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेत तो मंजुरसाठी ठेवण्यात येईल. तेथे मंजुरीनंतर तो शासनाकडे पाठविण्यात येणार असून, शासनाने मंजुरी दिली तर ही मोहीम हाती घेण्यात येईल.