पुणे : बाहेरगावी असल्याने अंगणातील तुळशीला पाणी देता न आल्याने तुळस सुकून गेली. आपण पाणी देऊ न शकल्याने तुळस मेल्याचे मुलीने वडीलांना सांगितले. मुलीच्या तुळस मेली या शब्दप्रयोगाने त्यांच्या मनात घर केले. आणि येथून पुढे प्रत्येक झाडाला वेदनामुक्त करण्याचा विडाच त्यांनी उचलला. ही कहाणी आहे, पुण्यात अंघोळीची गोळी या शिर्षकाखाली पर्यावरण रक्षणाबाबत जागृती करणाऱ्या माधव पाटील यांची. माधव पाटील आणि त्यांच्या मित्रांनी नेल फ्री अॅण्ड पेन फ्री ट्री असे कॅम्पेन सुरु केले असून या अंतर्गत पुणे शहरातील विविध झाडांना जाहीरात लावण्यासाठी ठोकण्यात आलेले खिळे काढण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आत्तापर्यंत शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते बालगंधर्व पर्यंत असलेल्या झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढण्यात आले आहेत.
...आणि त्यांनी उचलला झाडांना वेदनामुक्त करण्याचा विडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:12 IST
झाडांना वेदाना मुक्त करण्यासाठी नेल फ्री,अाणि पेन फ्री हे कॅम्पेन पुण्यातील माधव पाटील व त्यांचे सहकारी राबवत अाहेत. यात शहरातील झाडांना ठाेकण्यात अालेले खिळे काढण्याचे काम दर अाठवड्याच्या रविवारी करण्यात येते.
...आणि त्यांनी उचलला झाडांना वेदनामुक्त करण्याचा विडा
ठळक मुद्देगेल्या तीन अाठवड्यांपासून सुरु अाहे कॅम्पेनएक किलाेहून अधिक वजन भरेल इतके खिळे व तारा झाडांवरुन काढण्यात अाल्या