पुण्यातील सर्वाधिक कोरोना संक्रमित भागातील नागरिकांच्या स्क्रिनिंग आणि तपासणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकारजनकल्याण समिती करणार पालिकेला मदत : १०० झोपडपट्टयांमध्ये नागरिकांचे केले जाणार स्क्रिनिंगपुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला असून •ावानी पेठ, कसबा-विश्रामबाग आणि शिवाजीनगर-घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या भागावर लक्ष केंद्रित करीत तेथील नागरिकांचे स्क्रिनींग आणि तपासणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून १०० झोपडपट्ट्यांमध्ये समितीची पथके घरोघर जाऊन ही तपासणी करणार असल्याची माहिती महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली.शहराच्या मध्यवस्तीचा भाग आणि येरवडा उपनगरातील रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टीबहूल भागात ही रुग्ण संख्या वाढली आहे. याच भागावर समितीकडून विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. समिती ४० पथकांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांचे स्क्रिनिंग करणार आहे. पथकामध्ये एक डॉक्टर, दोन नर्स, दोन स्वयंसेवक आणि दोन पोलिसांचा समावेश असणार आहे. त्यांच्यासोबत औषधे, तापमापक यंत्रासह सज्ज अशी रुग्णवाहिका असणार आहे. सोमवारी आठ पथकांद्वारे मंगळवार पेठ, पुणे स्टेशन आदी परिसरात प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ, पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त, अतिरीक्त पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून लोकांना तपासणीचे आवाहन केले.राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समितीच्या कोरोना प्रभावित क्षेत्रातील स्क्रिनींग आणि टेस्टिंग योजनेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली असून येत्या ४ मे पर्यंत सर्वाधिक बाधित भागासह एकूण १०० वस्त्यांमध्ये हे काम केले जाणार आहे. ज्या रेड झोनमध्ये स्क्रिनिंग करण्याच्या एक दिवस किंवा किमान २४ आधी पालिकेकडून पूर्वसूचना देण्यात येणार आहे. यावेळी शारीरिक अंतर राखणे आणि सॅनिटायझर, मास्क बंधनकारक आहे. तपासणीदरम्यान सर्दी-ताप-खोकल्याची माहिती घेऊन त्यानुसार औषधे दिली जाणार आहेत. ज्या नागरीकांची कोरोना टेस्ट करणे आवश्यक वाटेल अशांची नोंद करुन ही यादी करून प्रशासनाला दिली जाणार आहे.समितीकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाणार असून सर्व डॉक्टरांना रोज नवीन पीपीई किट दिले जाणार असून त्यांच्या बाहेरच निवास-भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा पूर्ण झाल्यावर पाचव्या दिवशी डॉक्टरांची स्वॅब टेस्ट करण्यात येणार आहे. या पथकातील कर्मचारी, स्वयंसेवक आणि डॉक्टर यांचा विमा काढला जाणार आहे.======कोरोना पुण्यातील नागरिक बंधू-भगिनी, लहान मुले आणि वस्तीत राहणाऱ्या वंचित बांधवांसाठी शिधा आणि भोजन मोठया प्रमाणात पोहचवत आहोत. त्यांच्या आरोग्याच्या वाढत्या समस्या पाहता अनेक वस्तीमध्ये नागरिकांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची उपलब्धता नाही, असे निदर्शनास आले आहे. समाजातील सर्व मान्यवर डॉक्टर यांना नम्र विनंती आहे, की त्यांनी आपला थोडासा वेळ या समाजबांधवांसाठी द्यावा. सोमवारपासून वंचित वस्त्यांमध्ये सुरु होणाऱ्या व्यापक तपासणी आणि गरजूंना औषधोपचार अभियानात अधिकाधिक डॉक्टरांनी आरोग्यसेवा देण्यासाठी पुढे यावे.- रवींद्र वंजारवाडकर, संघचालक, पुणे======राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने शहरातील रेड झोनमध्ये काम करण्याचे निश्चित केले असून समिती पालिकेच्या मदतीने नागरिकांचे स्क्रिनिंग करणार आहे. आज प्रत्यक्ष या कामाला सुरुवात झाली असून मी पालिका व पोलीस अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. नागरिकांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी. लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घ्यावेत.- मुरलीधर मोहोळ, महापौर
पुण्यात "रेडझोन" भागातील नागरिकांच्या स्क्रिनिंग आणि तपासणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:32 PM
आठ पथकांद्वारे मंगळवार पेठ, पुणे स्टेशन आदी परिसरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात
ठळक मुद्देडॉक्टरांना रोज नवीन पीपीई किट दिले जाणार असून त्यांच्या निवास-भोजनाची व्यवस्थारेड झोनमध्ये स्क्रिनिंग करण्याच्या एक दिवस किंवा किमान २४ आधी पालिकेकडून पूर्वसूचना आरोग्य सेवा पूर्ण झाल्यावर पाचव्या दिवशी डॉक्टरांची स्वॅब टेस्ट करण्यात येणार या पथकातील कर्मचारी, स्वयंसेवक आणि डॉक्टर यांचा विमा काढला जाणार