पुणे : कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याचा समाजातील सर्व स्तराला फटका बसला आहे. शहरातील विविध भागात कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर घरकाम करणार्या महिलांना सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे त्या महिलांवर उपासमारिची वेळ आली आहे. अशा घरकाम करणार्या महिलांच्या मदतीसाठी अनेक जणांनी पुढाकार घेतला आहे. समाज माध्यमाद्वारे घरकाम करणार्या महिलांचा पगार देण्यात यावा अशी मोहिम हातात घेण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घरकाम करणार्या महिलांना पगार दाव्या अशी मोहीम समाज माध्यवांवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सुरू केली आहे. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शहरात एक लाखापेक्षा जास्त घर कामगार महिला आहेत. कोरोनाच्या सावटानंतर घरकाम करणार्यां महिलांना सुट्टी दिली आली आहे. यामुळे अनेक नागरिकांनी घरकाम करणार्या महिलांचा पगार दिला नाही आहे. यामुळे घर काम करणार्या महिलांसमोर एक मोठ संकट उभे राहिले आहे. तसेच इतरही नागरिकांनी आपल्या घर कामगार महिलांना मार्च आणि एप्रिल महिण्या पूर्ण पगार द्वावा असे आवाहन करत आहे. यामुळे अनेक वर्षा पासून आपल्या घरात काम करणार्या महिलांना मोठी मदत होणार आहे. यामोहिमेचे अनेकांनी स्वागत केले असून त्यात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसेच काही सामाजिक कार्यकते, संघटक, समाजसेवक यांनी नागरिकांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे.
* घरकाम करणाऱ्या महिलांना न्याय कधी मिळणार ? सध्याच्या परिस्थिती पाहता यापूर्वी विभागीय आयुक्त, कामगार आयुक्त यांना घरकाम करणाऱ्या महिलांना लॉकडाऊनच्या काळात पूर्ण पगार द्यावा यासंबंधी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. घरकाम करणार्या महिलां स्वत:हून सुट्टीवर गेल्या नाहीत. त्यांच्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे. याचा विचार करावा. जर त्यांना पगार मिळाला नाही त्यांची उपासमार होईल. नागरिकांनी उदार होऊन घर काम करणार्या महिलांना पगार दायला हवे. गेल्या अनेक वर्षापासून बरोबर घर काम करणार्या महिलांना पगारी सुट्टी देण्यात येत नाही. त्या सुट्टा आता देण्यात येत आहे. असे समजावे. नागरिकांनी सहकार्याची भावना दाखवून घरकाम करणार्या महिलांना पगार दायला हवा.
- किरण मोघे (जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा घर कामगार संघटना )