कर्वेनगर : चांदणी चौकाकडून कोथरूडच्या दिशेने जाणाºया तीव्र उताराच्या रस्त्यावर डंपरचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावरून जाणाºया आयटी इंजिनिअर तरुणीसह १० वर्षांच्या शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. एक महिला जखमी झाली आहे. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.पूजा चव्हाण (वय २३) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. निकिता दत्ता माने या शालेय विद्यार्थिनीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शीतल राठोड (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रकचालक तेजू भिकू राठोड याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डंपर बाणेरवरून कोथरूडच्या दिशेने जात असताना, चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाºया पौड रस्त्याच्या तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटला. याच वेळी उतारावरून जात असलेल्या तिघींना धडक बसली.पूजा चव्हाण या लोहिया जैन आयटी पार्कमध्ये इंजिनिअर होत्या. निकिता कोथरूडमधील एका शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असल्याची माहिती हाती आली आहे. डंपरचे ब्रेक निकामी झाल्याचा दावा चालकाने केला आहे. अपघातानंतर नागरिकांनी डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.अजब योगायोगदहा महिन्यांपूर्वी (२ सप्टेंबर २०१६) रोजी शुक्रवारीच सकाळी नऊच्या सुमारास याच तीव्र उतारावर पुणे महापालिकेच्या कचरागाडीने दोन रिक्षा, सँट्रो, वॅगनआर, फियाट पंटो अशा पाच वाहनांना ठोकरले होते. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता.बहुमजली पुलाचेकेवळ आश्वासनचदहा महिन्यांपूर्वीच्या अपघातानांतर चांदणी चौकातील बहुमजली पूल, सर्व्हिस रस्ता असे मुद्दे ऐरणीवर आले होते. सहा महिन्यांवर निवडणुका आल्याने तो राजकारणाचा मुद्दा केला गेला. अनेक आश्वासनांच्या फैरी झाडल्या गेल्या. एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजपा आश्वासने देतच होती. मध्येच राष्ट्रवादीदेखील पूल करण्यासाठीच्या तयारीत असल्याचे भासवत होते. त्यानंतरकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रीनितीन गडकरी यांनीही या पुलाला निधी दिल्याचे सांगितले गेले. मात्र अनेक तांत्रिक बाबी पुढे करून, पुलाचे काम रेंगाळत ठेवले गेले आहे. सर्व्हिस रस्त्याबाबत तर न बोललेलेच बरे, अशा संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
इंजिनिअर तरुणीसह विद्यार्थिनी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:20 AM