धनकवडी : मद्यपान करून वारंवार त्रास देणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी धनकवडी पोलीस चौकीत आणलेल्या सुमित सदाशिव सागर (वय २५, रा. पर्वती दर्शन) हा लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना पडून जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.पप्पू रेणुसे हे धनकवडी येथे राहतात. पर्वती दर्शन येथे राहणारा सुमित सागर हा पप्पू यांचा मावस भाऊ आहे. सुमित मद्यपान करून रेणुसे कुटुंबीयांशी नेहमी भांडण करायचा. बुधवारी मध्यरात्री सुमित मद्यधुंद अवस्थेत धनकवडीत आला आणि रेणुसे यांच्याशी वादावादी करू लागला. तासभर सुमितने धिंगाणा केला. अखेर रेणुसे यांनी त्याला धनकवडी पोलीस चौकीत आणले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देवून तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस अटक करणार या भितीपोटी लघुशंकेचा बहाणा करून सुमित बाथरूमकडे गेला. मोठा आवाज आल्यानंतर सर्वांनी बाहेर येवून पाहिले असता सुमित व्हरांड्यात जखमी अवस्थेत पडला होता.सुमित हा के. के. मार्केट येथे बिगारी काम करतो.
धनकवडी पोलीस ठाण्यात आणलेला मद्यपी लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 4:16 PM
मद्यपान करून वारंवार त्रास देणाºयाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी धनकवडी पोलीस चौकीत आणलेल्या सुमित सदाशिव सागर (वय २५, रा. पर्वती दर्शन) हा लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना पडून जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.
ठळक मुद्देसुमित मद्यपान करून रेणुसे कुटुंबीयांशी नेहमी करायचा भांडणसुमित हा के. के. मार्केट येथे करतो बिगारी काम