शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

अडीच पटीने वाढली कांद्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 12:03 AM

भावात किंचीत वाढ : चाकण बाजारात बटाटा आवक तिपटीने घटूनही भाव दीडपटीने घटले

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवकेत अडीचपटीने वाढ होऊन भावात किंचित वाढ झाली. बटाटा आवक तिपटीने घटूनही भाव दीडपटीने घटले. आज कांदा व बटाट्याला ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तरकारी विभागातील आडतदार विष्णू केरू गोरे यांच्या गाळ्यावर सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथून ५० पोती चमेली बोरे व बीड जिल्ह्यातून ५ टन तैवान पपईची आवक झाली. पपईला १० ते १२ रुपये किलो, तर बोरांना १६ ते १८ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. संक्रांतीचा सण जवळ आल्याने बोरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आडतदारांनी वर्तवली आहे.

तरकारी बाजारात हिरवी मिरची, वाटाणा आवक वाढली व टोमॅटोची आवक घटली. बाजारात गवार व शेवग्याचे भाव चांगलेच कडाडले, शेवग्याच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत अडीच पटीने वाढ झाली. गवारीला ५००० रुपये, तर शेवग्याला ६००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालकची आवक वाढली. मेथी व शेपूचे भाव घटले, तर कोथिंबिरीचे भाव वाढले. जनावरांच्या बाजारात बैल व शेळ्या-मेंढ्यांची विक्री घटली व म्हशींच्या विक्रीत वाढ झाली. म्हशींना एक लाख रुपयांपर्यंत भाव मिळाला. राजगुरुनगर बाजारात ९० हजार मेथीच्या व ५० हजार कोथिंबीर जुड्यांची आवक झाली. शेलपिंपळगाव उपबाजारात कोथिंबीर जुडीला साडेबावीस रुपये प्रतिजुडी भाव मिळाला. चाकण बाजारात एकूण ३ कोटी २० लाख रुपये उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १४३९५ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक ८७८५ क्विंटलने वाढून भावात ९५ रुपयांची वाढ झाली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ५९० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक १३०५ क्विंटलने वाढून घटून भाव ५०० रुपयांनी घटले. बटाट्याचा कमाल भाव १४०० रुपयांवरून ९०० रुपयांवर स्थिरावला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ५७३ पोती, वाटाण्याची ७९५ पोती व टोमॅटोची ८९७ क्रेट्स आवक झाली. हिरव्या मिरचीला ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. राजगुरुनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ९० हजार जुड्यांची आवक होऊन ५०० ते १५०० रुपये प्रति शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ५० हजार जुड्यांची आवक होऊन ७०० ते १५०० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेलपिंपळगाव उपबाजारात मेथीच्या ८ हजार व कोथिंबिरीच्या ५ हजार जुड्या आवक झाली.

शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :कांदा - एकूण आवक - १४३९५ क्विंटल. भाव क्रमांक १ : ९०० रुपये, भाव क्रमांक : ५०० रुपये, भाव क्रमांक ३ : २५० रुपये.बटाटा - एकूण आवक - ५९० क्विंटल. भाव क्रमांक १ : ९०० रुपये, भाव क्रमांक २ : ७०० रुपये, भाव क्रमांक ३ : ५०० रुपये.भुईमूग शेंग - एकूण आवक - ५ क्विंटल. भाव क्रमांक १ : ५००० रुपये, भाव क्रमांक २ : ४५०० रुपये, भाव क्रमांक ३ : ३००० रुपये.लसूण - एकूण आवक - ८ क्विंटल. भाव क्रमांक १ : २००० रुपये, भाव क्रमांक : १५०० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : हिरवी मिरची - ५७३ पोती (२५०० ते ३५०० रु.), टोमॅटो - ८९७ पेट्या (९०० ते १८००), कोबी - २७४ पोती (४०० ते ८००), फ्लॉवर - ३३५ पोती (८०० ते १६००) , वांगी - ३७४ पोती (२५०० ते ३५००), भेंडी - ४२८ पोती (२५०० ते ३५००), दोडका - २६८ डाग (२५०० ते ३५००), कारली - ३१९ डाग (२५०० ते ३०००), दुधी भोपळा- १८५ पोती (१००० ते २०००),काकडी - २२६ पोती (१००० ते २५००), फरशी - १०९ पोती (२५०० ते ३५००), वालवड - ३४७ पोती (२५०० ते ३५००), गवार - १८७ पोती (३००० ते ५००० रू.), ढोबळी मिरची - ४५९ डाग ( १५०० ते ३५००), चवळी - १३७ डाग (१५०० ते २५००),वाटाणा - ७९५ पोती (१५०० ते २५०० ), शेवगा - ११६ डाग (४००० ते ६०००).पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :मेथी - एकूण १९९५३ जुड्या (५०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - एकूण १४१६४ जुड्या (१००० ते १६००), शेपू - एकूण ३४७८ जुड्या (५०० ते ९००), पालक - एकूण ६३४६ जुड्या (३०० ते ६००).४जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७० जर्शी गायींपैकी ३० गार्इंची विक्री झाली. ( १०,००० ते ६०,००० रुपये),१४० बैलांपैकी ९० बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३५,०००), १७० म्हशींपैकी १२५ म्हशींची विक्री झाली. (२०,००० ते १,००,०००),शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १०५८० शेळ्या-मेंढ्यांपैकी ९५५० शेळ्या-मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १५०० ते १०,००० रुपये इतका भाव मिळाला. बाजारात २ कोटी १० लाखांची उलाढाल झाली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती