विशेष म्हणजे तपासणीसाठी गेलेल्या चाळीसपैकी एकोणीस इच्छुक प्लाझ्मा दात्यांचे नमुने यशस्वी आले असून त्या सर्वांनी प्लाझ्मा दानाची तयारी दर्शविली आहे. ही प्रक्रिया येत्या दोन दिवसांमध्ये पूर्ण होईल.
कोरोना महामारीच्या काळामध्ये इतक्या उत्स्फूर्तपणे पुढे येऊन प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करण्यास जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमचे अध्यक्ष महावीर ओसवाल, सचिव महावीर सोनिग्रा आणि प्रशांत जैन यांनी विशेष पुढाकार घेतला. एस. पी. जी. फौंडेशनचे विपुल गुंदेशा यांनी सर्वस्वी स्वतःला प्लाझ्माशी संबंधित सर्व सेवेसाठी वाहून घेतले आहे. रुबी हॉल क्लिनिकचे कालेकर यांची टीम ब्लड बँक अहोरात्र प्लाझ्मादान करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी मेहनत घेत आहे.
"एका 'प्लाझ्मा दानाने' तीन ते चार गरजूंना जीवदान मिळू शकते , म्हणून कोविड मधून बऱ्या झालेल्या सर्व नागरिकांनी रक्तदान करण्यापूर्वी आणि लस घेण्याआधी प्लाझ्मा दान जरूर करावे", असे आवाहन जैन सोशल ग्रुपचे कार्यकारिणी सदस्य राजेश शहा यांनी केले.