पुणे : सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा, अशी गर्भित धमकी दिली होती. तेव्हा जीवाला धोका आहे, अशी तक्रार मी पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी कोणताही दखलपात्र गुन्हा नोंदविला नाही. पुनाळेकर याला पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर या धमकीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केली.अॅड. पुनाळेकर कायद्याचा गैरवापर करणारा आणि गुन्हेगारी प्रवृतीचा वकील असण्याची खात्री देशाला त्याच्या पराक्रमातून झालेली आहे. तीन वर्षांपूर्वी अ. भा. मराठी साहित्य संंमेलनाचा अध्यक्ष असताना याच पुनाळेकरने मला टिष्ट्वट करून ‘मॉर्निंग वॉकला चालत जा’ अशी धमकी दिली होती. त्यावेळी राज्य सरकारला लिखित अर्ज केला होता. मात्र. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदविला नाही. उलट यात कोणतेही तथ्य नाही म्हणून या व्यक्तीला क्लिन चीट दिली.सीबीआयने दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने त्याला अटक केली आहे. सनातनमुळे भारतीय संविधानाला धोका आहे. माझ्या प्रकरणात पुनाळेकरची चौकशी करावी अशी मागणी पोलिस आणि सीबीआयकडे करीत आहे, असे सबनीस यांनी सांगितले.
पुनाळेकरने मला दिलेल्या धमकीची चौकशी करावी, डॉ. श्रीपाल सबनीस यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 5:01 AM