वेल्हे तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर, सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे, नाना राऊत, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, संतोष लिम्हण, मार्गासनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे, शिवाजी चोरघे, विंझरचे सरपंच विनायक लिम्हण, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, रवि लिम्हण, उपसरपंच दत्ता गायकवाड, संगीता मोरे, माजी सरपंच संतोष मोरे, सुनील राजीवडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संग्राम थोपटे म्हणाले की, वेल्हे तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. ओढ्यांना नद्यांचे स्वरूप आले असून ठिकठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्ते देखील खचले आहेत. डोंगर उतारावर धोक्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात सध्या भातलावणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी जास्त आले आहे. शेतीचे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभाग यांच्यामार्फत ताबडतोब पंचनामे करावेत. आपत्ती व्यवस्थापन समितीने दक्ष राहून तालुक्यातील आपत्तीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याच्या सूचना देखील यावेळी आमदार थोपटे यांनी दिल्या.
२४ मार्गासनी
तहसील कार्यालयातील बैठकीस उपस्थित असलेले संग्राम थोपटे व इतर.