लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : येथील युवक रश्मीकांत तोरणे हत्याप्रकरणी तपास भरकटत ठेवणाऱ्या तपासी अंमलदार अंकुश खोमणे यांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तोरणे कुटुंबीयांनी केली.जिल्हा ग्रामीण पोलिस प्रमुखांना उमाकांत तोरणे व रणधीर भोसले यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. तपासात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून तब्बल १६ महिने तपासभरकटत ठेवणाऱ्या तपासी अंमलदार खोमणे व दोन सहायक पोलीस निरिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १७ जुलै २०१७रोजी तोरणे कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करताच उपोषणस्थळी विश्वास नांगरे पाटील यांनी भेट देऊन जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुखांना १५ दिवसांत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले.त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपवली.दरम्यान या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली होता. त्याच्याकडे वेळोवेळीकेलेल्या तक्रारीकडे त्यांनीही दुर्लक्ष करून बावडा पोलिसांना पाठीशी घातले.अखेर कोल्हापूरत कुटुंबीयांनी अपहृत रश्मीकांतच्या तपासासाठी उपोषण केल्यावर स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेऊन पुण्याच्या एलसीबीकडे नागरे पाटील यांनी तपास सोपवला व त्या पथकाने अवघ्या १२ दिवसांत रश्मीकांतचा अपहरण करून खून केल्याचा गुन्हा उघड केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी बारामती उपविभागामार्फत न करता त्रयस्थामार्फत अधिकाºयांमार्फत करून कारवाईची मागणी तोरणे कुटुंबीयांनी केली आहे.राजकीय दबावाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्नया प्रकरणात निलंबीत झालेले पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्यावर बारामती उपविभागाने ठपका ठेवला तर मूळ तपासी अंमलदारावर मेहेरनजरा दाखवून क्लिनचिट देण्याचा राजकीय दबावाने प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. चौकशी काळात तक्रारदाराची बाजूही बांगर यांनी समजून घेतली नाही.
त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून अंमलदाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 2:53 AM