अवघे दहावीपर्यंतचे शिक्षण झालेल्या प्रमोद मांडेकर यांनी लॉन शेतीच्या माध्यमाने चांदे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना प्रगतशील शेतीचा मार्ग दाखवून आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्याच शेतात लॉन शेतीबरोबरच विविध पीक प्रात्यक्षिके घेतली जातात मागील खरीप हंगामात आंबेमोहर पिकाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर रब्बी हंगामासाठी हरभरा पिकाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. या पिकाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व त्यांचे सहकाऱ्यांनी चांदे येथे हरभरा प्लॉटला भेट दिली.
यावेळी येणाऱ्या कालावधीत घाटेअळी प्रादुर्भावची शक्यता लक्षात घेता एकात्मिक घाटेआळी कीड व्यवस्थापनाबाबतही हासरमणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी पिरंगुट, एन. बी. झंजे, कृषी परीक्षक आर. एम. डोंगरे, कृषी सहायक एन. जे. देवकर, पोलीस पाटील हनुमंत मांडेकर, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर उपस्थित होते.
-
फोटो ०६ पौड हरभरा प्लांट
फोटो :- चांदे येथील प्रयोगशील शेतकरी प्रमोद मांडेकर यांच्या शेतात प्रात्यक्षिक म्हणून लागवड करण्यात आलेल्या हरभरा पिकाची पाहणी करताना के. एम. हसरमनी व समवेत अन्य कृषी अधिकारी.