कोरोना नियंत्रणासाठी पदाधिकारी व अधिकारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी आदिवासी भागात कोराना सेंटर व्हावे, अशी आग्रही मागणी आमदार अतुल बेनके यांच्याकडे केली होती. बेनके यांनी याची दखल घेत प्रशासनास सूचना दिल्या होत्या. तहसीलदार हनुमंत कोळेकर ,गट विकास आधिकारी सतीशचंद्र माळी , आरोग्य आधिकारी उमेश गोडे यांनी सोमतवाडी कन्या आश्रमशाळा येथे जाऊन पाहणी केली. या ठिकाणी कोराना उपचार केंद्र करण्यास प्रशासनाने देखील तयारी दर्शवली आहे .हे केंद्र उभे राहिल्यानंतर
आदिवासी भागातील कोरोना रुग्णांची उपचारासाठी रुग्णालय ,बेड मिळवण्यसाठीची होत असलेली ससेहोलपट थांबणार आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी व्यक्त केली.
सोमतवाडी कन्या आश्रमशाळा येथे करोना उपचार केंद्रासाठी पाहणी करताना तहसीलदार हनुमंत कोळेकर , जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, तालुका आरोग्य आधिकारी उमेश गोडे.